ETV Bharat / state

सातारच्या क्रीडा संकुलात 78 बेडचे कोविड रुग्णालय सुरू

जिल्हा क्रीडा संकुलात नव्याने सुरु करण्यात आलेल्या जिल्हा कोविड रुग्णालयाचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. कोरोना रुग्णांना अधिकच्या सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

कोव्हिड हॉस्पिटल
कोव्हिड हॉस्पिटल
author img

By

Published : Apr 26, 2021, 9:46 PM IST

Updated : Apr 26, 2021, 10:34 PM IST

सातारा - राज्यासह जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये सातारा जिल्हा कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयात 78 ऑक्सिजन बेड असून कोरोना रुग्णांवर उपचार होणार आहेत.

जिल्हा क्रीडा संकुलात नव्याने सुरु करण्यात आलेल्या जिल्हा कोविड रुग्णालयाचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. कोरोना रुग्णांना अधिकच्या सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, की राज्य सरकारने कडक निर्बंध घातलेले आहेत. तरीही काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. त्याचा परिणाम रुग्णवाढीवर होत आहे. तरी नागरिकांनी सरकारने घातलेल्या निर्बंधांचे पालन करावे. ज्या कुटुंबातील व्यक्ती कोरोनाबाधित आहेत, अशा कुटुंबातील व्यक्तींनी घराबाहेर पडू नये. तसेच नागरिकांनी मास्कचा वापर, वेळोवळी हाताची स्वच्छता, सुरक्षित अंतर व विनाकरण घराबाहेर पडू नये. या कोरोनाच्या लढाईत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले.

क्रीडा संकुलात 78 बेडचे कोविड रुग्णालय सुरू

हेही वाचा-पश्चिम बंगाल: मुख्यमंत्री बॅनर्जींनी बजावला मतदानाचा हक्क; 75.06 टक्के मतदानाची नोंद

हे लोकप्रतिनिधी व अधिकारी राहिले उपस्थित

कोविड रुग्णालयाचे उद्घाटन
कोविड रुग्णालयाचे उद्घाटन
उद्घाटनप्रसंगी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण आदी उपस्थित होते.

हेही वाचा-नाशिकला निश्चित सूत्रानुसार रेमडेसिवीर वितरण करावे- छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Last Updated : Apr 26, 2021, 10:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.