सातारा - पाटण तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या 56 वर पोहचली आहे. यामध्ये दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर एक बालक कोरोनामुक्त झाले आहे. तर उर्वरित 53 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. शनिवारी रात्री उशिरा ताम्हीणे येथील एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला. दररोज संशयीत व्यक्तींची स्वॅब चाचणी घेण्यात येत आहे. 25 व्यक्तींचे स्वॅब नमुने अहवाल प्रलंबित असल्याची माहिती उप विभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. पाटील यांनी दिली.
तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता 56 झाली आहे. यात सुरूवातीचे डेरवन येथील दहा महिन्याचे बालक कोरोनामुक्त झाले तर बनपुरी व जांभेकरवाडी येथील प्रत्येकी एका महिलेचा यात मृत्यू झाला आहे. उर्वरित रूग्णांमध्ये बनपुरी 7, शिरळ 5, चाळकेवाडी 2, म्हावशी 1 , धामणी 5 शितपवाडी 3, गावडेवाडी 2, भालेकरवाडी 1, गलमेवाडी 3, गोकुळतर्फ पाटण 3, सदूवरपेवाडी 5, आडूळ ( काळेवाडी ) 1, भरेवाडी 1, नवारस्ता 2, मोरेवाडी ( मोरगिरी ) 2 , आडदेव 2, जांभेकरवाडी 2, ताम्हीणे 3 , घाणबी 1, करपेवाडी 1, नवसरवाडी 1 अशा 53 व्यक्तींचा समावेश आहे. या सर्वांवर सध्या कराड येथील कृष्ण रुग्णालायत उपचार सुरू आहेत.
कोरोनाबाधित रूग्णांच्या संपर्कातील 69 व्यक्तींना पाटण व तळमावले येथील कोरोना केअर सेंटर व बी. एड. काॅलेज पाटण येथे ठेवले आहे. यात ज्यांचे अहवाल निगेटिव्ह येवून त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपला अशांना टप्याटप्याने घरी सोडण्यात येत आहे.