ETV Bharat / state

महाबळेश्वर, पाचगणी नगरपरिषद हद्दीतील अनिवासी व्यक्तींना उद्या 12 पर्यंत जिल्हा सोडण्याचे आदेश

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्ह्यात करण्यात येत आहेत. यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 मधील तरतुदीनुसार काही आदेश जाहीर केले आहेत.

महाबळेश्वर, पाचगणी नगरपरिषद
महाबळेश्वर, पाचगणी नगरपरिषद
author img

By

Published : Mar 22, 2020, 7:51 PM IST

Updated : Mar 22, 2020, 8:31 PM IST

सातारा - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्ह्यात करण्यात येत आहेत. यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 मधील तरतुदीनुसार काही आदेश जाहीर केले आहेत. यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद आणि पाचगणी नगरपरिषद तसेच क्षेत्र महाबळेश्वर, तापोळा, खिंगर या ठिकाणी बाहेरून आलेल्या व्यक्तींना उद्या 23 मार्च 2020 रोजीच्या दुपारी 12 वाजल्यानंतर क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 नुसार खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत.

महाबळेश्वर, पाचगणी नगरपरिषद हद्दीतील अनिवासी व्यक्तींना उद्या 12 पर्यंत जिल्हा सोडण्याचे आदेश
  • उद्या 23 मार्च दुपारी 12 नंतर मूळ मालक व त्यांचे कुटुंबीय (यामध्ये आई,वडील, पत्नी व मुले) यांच्या व्यतिरीक्त अन्य व्यक्तींना या ठिकाणी वास्तव्य करण्यास मनाई केली आहे.
  • या व्यक्तींनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत सातारा जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्राबाहेर जायचे आहे.
  • या व्यक्तींना 23 मार्च रोजीच्या दुपारी 12 वाजेपर्यंत इतर कोणत्याही व्यक्तींच्या संपर्कात येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, जिल्ह्याच्या कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात वास्तव्य करण्यास मनाई केली गेली आहे.
  • या व्यक्ती वर नमूद केलेल्या ठिकाणी खाजगी बंगल्यामध्ये वास्तव्यास असल्यास व्यक्तींनी त्यांच्या मूळ गावी वास्तव्यास जायचे आहे.
  • अनिवासी आणि स्थानिक नसलेल्या सर्व व्यक्तींनी (नोकरीनिमित्त वास्तव्य करीत असलेल्या कर्मचारी, हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मागील तीन महिन्या पूर्वीपासून कार्यरत असलेले कर्मचारी वगळून) या ठिकाणी वास्तव्य करण्यास मनाई केली आहे.

Last Updated : Mar 22, 2020, 8:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.