सातारा - काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि विधानपरिषदेचे माजी सभापती, दिवंगत ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांनी स्वत:च्याच पक्षाला रामराम ठोकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच देशमुख यांच्या भाजप प्रवेशामुळे गेल्या अनेक दिवसांपासून आघाडीला लागलेली गळती सुरुच आहे.
हेही वाचा - लोकसभा लढवणार नाही, विधानसभा निवडणूक कराड दक्षिणेतूनच - पृथ्वीराज चव्हाण
महाजनादेश यात्रेच्या तिसरा टप्प्यात मुख्यमंत्री येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर निशाणा साधला. तसेच युतीच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, आमचा संवाद योग्य रितीने सुरू आहे आणि आमची चर्चा शेवटच्या टप्प्यात आली आहे. लवकरच योग्य वेळी युती होईल, असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
हेही वाचा - 'नोकऱ्या भरपूर, योग्य उमेदवार नाहीत', भाजप मंत्र्याच्या वक्तव्यावर मायावती, प्रियांकांची टीका
तर सत्यजित देशमुख यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली होती. शरद पवार यांनी शिवाजीराव देशमुख साहेबांवर अन्याय केला. त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पवार यांनी नेहमी प्रयत्न केले, अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर आगपाखड केली होती.