ETV Bharat / state

चिकन खातंय भाव... कोंबड्या संपल्याना राव..., दिवसागणिक दरामध्ये मोठी वाढ - chicken high demand in satara

चिकनमुळे कोरोना होतो, या अफवेमुळे मार्च-एप्रिल महिन्यांमध्ये पोल्ट्री व्यवसायिकांचे कंबरडे मोडले होते. मात्र मे महिन्यात कुणी कोंबडी देता का? असे म्हणायची वेळ चिकनप्रेमींवर आली आहे. मागणी जास्त व पुरवठा नगण्य यामुळे गावठी कोंबड्या पाचशे रुपयांना एक तर बाॅयलर चिकन तब्बल अडीचशे रुपये किलोने विकले जात आहे.

chicken rates getting higher in satara district because of high demand
चिकन खातंय भाव... कोंबड्या संपल्याना राव..., दिवसागणिक दरामध्ये मोठी वाढ
author img

By

Published : May 21, 2020, 6:36 PM IST

सातारा - चिकनमुळे कोरोना होतो या अफवेमुळे, मार्च-एप्रिल महिन्यांमध्ये पोल्ट्री व्यवसायिकांचे कंबरडे मोडले होते. मात्र मे महिन्यात कुणी कोंबडी देता का? असे म्हणायची वेळ चिकनप्रेमींवर आली आहे. मागणी जास्त व पुरवठा नगण्य यामुळे गावठी कोंबड्या पाचशे रुपयांना एक तर बाॅयलर चिकन तब्बल अडीचशे रुपये किलोने विकले जात आहे.

कोरोनाने मार्च महिन्यात भारतात हातपाय पसरायला सुरुवात केली. याकाळात चिकन खाल्ल्यामुळे कोरोना होतो, ही अफवा समाज माध्यमावर पसरली आणि चिकन व्यवसायिकांचे धाबे दणाणले. अफवेमुळे चिकनविक्री ठप्प झाली, दर गडगडले. दोन ते तीन किलोच्या कोंबड्या फक्त ५० रुपयांना विकण्यात आल्या. काही ठिकाणी तर फुकटही कोंबड्या दिल्या गेल्या. काही जणांनी लहान पिल्ले अक्षरश: पुरून टाकली किंवा रानोमाळ सोडून दिली. एका अफवेमुळे पोल्ट्री व चिकन व्यवसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले.

चिकन दराविषयी सांगताना विक्रेता...
मात्र, काही दिवसांनी चिकनमुळे कोरोना होत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला. त्यानंतर पुन्हा एकदा बाजारात खवैय्यांची पावले चिकनकडे वळू लागली. हळूहळू चिकनचा भाव वाढू लागला. बाजारात माल कमी पडू लागला. आता तर चिकनचा दर किलोला अडीचशे रुपयांपर्यंत पोहोचला आहे. काही दिवसांत या दरानेही चिकन मिळणे अवघड आहे. कारण पोल्ट्री व्यवसायाशी निगडीत कारखाने बंद आहेत. त्यातच नवीन पिल्ले सुद्धा उपलब्ध नाहीत. त्यामुळे आगामी काळात चिकनचे भाव गगनाला भिडतील, असा अंदाज आहे.

तशात चारकमानी मंडळी मोठ्या प्रमाणात गावी आल्यामुळे पार्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यांनी मिळेल त्या भावाने गावठी कोंबड्या घेऊन त्या फस्त केल्या. जे बोकडाच्या मटणाचे शौकीन आहेत, त्यांनी अख्खे बोकड कापण्याचा सपाटा लावला आहे.

हेही वाचा - सातारा जिल्ह्यात आणखी 15 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या 181

हेही वाचा - गुजरातपासून कारवारपर्यंत मृतदेहाची हेळसांड; अखेर कराडमध्ये झाले अंत्यसंस्कार

छोटूमिया मुलाणी, चिकन व्यवसायिक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.