सातारा : भरधाव कारचा अचानक टायर फुटल्याने कारने दुचाकीला जोराची धडक (Car tire burst hit bike) दिली. या भीषण अपघात दोन जण ठार तर लहान मुलासह पाच जण जखमी (car and bike accident Satara) झाले आहेत. सातारा-मेढा रस्त्यावर चिंचणी (ता. सातारा) हद्दीत शुक्रवारी दुपारी हा अपघात झाला. भरत यदु शेलार (वय ४८, रा. थोरली काळोशी) आणि रघुनाथ दत्तात्रय चिकणे (वय ५४, रा. मेढा), अशी मृतांची नावे आहेत. (Satara Crime) (Latest News Satara), (Satara Medha highway Accident)
टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला - घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मेढ्याहून सातारकडे येणाऱ्या कारचा चिंचणी गावच्या हद्दीत अचानक टायर फुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला उडवले. त्यानंतर दोन्ही वाहने नाल्यामध्ये पडली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. तर कारमधील चौदा वर्षाच्या मुलासह ५ जण जखमी झाले.
ग्रामस्थांसह पोलिसांची घटनास्थळी धाव - अपघाताची माहिती मिळताच चिंचणीसह परिसरातील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. सातारा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्यासह पोलीस कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. अपघाताची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून महेंद्र पाटोळे तपास करत आहेत.