ETV Bharat / state

साताऱ्यातील धोम धरणाचा डावा कालवा फुटला; ऊसतोड मजुरांच्या झोपड्या गेल्या वाहून, दोन बैलं बेपत्ता - कालवा फुटला

Canal Brust In Satara : साताऱ्यातील धोम धरणाचा डावा कालवा फुटला असून त्यामुळं ओझर्डे गावात पूर आला आहे. या पुरात उसतोड मजुरांच्या झोपड्या वाहून गेल्या आहेत. तर पुरात वाहून जाणाऱ्या 12 बैलांना वाचवण्यात यश आलं आहे. तर दोन बैलं अद्यापही बेपत्ता आहेत.

Canal Brust In Satara
धोम धरणाचा डावा कालवा फुटला
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 16, 2023, 9:25 AM IST

सातारा Canal Brust In Satara : धोम धरणाच्या डाव्या कालव्याचा भराव वाहून गेल्यानं वाई तालुक्यातील ओझर्डे गावानजीक शनिवारी पहाटे धरणाचा डावा कालवा फुटला. यामुळे चंद्रभागा ओढ्याला पूर आला आहे. ऊसतोड मजुरांच्या ओढ्याकाठी उभारलेल्या झोपड्या आणि जनावरं पुरातून वाहून गेली आहेत. 12 बैलांना वाचवण्यात आलं असून दोन बैलांचा शोध सुरू आहे. सध्या प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून कालवा बंद करण्यात यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Canal Brust In Satara
धोम धरणाचा डावा कालवा फुटला

लाखो लिटर पाणी गेलं वाहून : वाई तालुक्यातील ओझर्डे परिसरात धोम धरणाचा डाव्या कालव्याचा भराव वाहून गेल्यानं शनिवारी पहाटे कालवा फुटला. यामुळं लाखो लिटर पाणी ओझर्डे इथल्या चंद्रभागा ओढ्यातून वाहत आहे. सध्या या ओढ्याला मोठा पूर आला आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर असताना घडलेल्या या घटनेमुळं शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. सध्या कालवा बंद करण्यात आला आहे. वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत.

कालवा फुटल्यानं ओढ्याला पूर : कालवा फुटल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी ओझर्डे गावच्या चंद्रभागा ओढ्यात शिरलं. त्यामुळं ओढ्याला मोठा पूर आला. यामध्ये ऊसतोड मजुरांच्या ओढ्याकाठच्या झोपड्या आणि जनावरं ओढ्याच्या पुरातून वाहून गेली. 12 बैलांना वाचवण्यात यश आलं असून दोन बैलांचा शोध सुरू आहे.

प्रशासनाकडून मदत कार्य सुरू : कालवा फुटून झालेल्या दुर्घटनेत ऊसतोड मजुरांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांचा संपूर्ण संसारंच पुरातून वाहून गेला आहे. त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. प्रशासनानं सध्या ऊसतोड मजुरांसाठी मदत कार्य सुरू केलं आहे.

दुष्काळी भागासाठी सोडलं होतं पाणी : दुष्काळी भागासाठी धोम धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येत असताना शनिवारी पहाटे कालव्याला भगदाड पडलं. पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता की कालव्यातील पाणी शेतातून थेट चंद्रभागा ओढ्याच्या पात्रात घुसलं. यामध्ये ऊसतोड मुजरांच्या झोपड्या वाहून गेल्या. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

हेही वाचा :

  1. Eknath Shinde Koyna Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कोयना जलाशयातून बोटीने प्रवास, पाहा व्हिडिओ
  2. Koyna Dam Seems To Frozen, साताऱ्यात हुडहुडी, पाहा कोयना धरणाचा शिवसागर जलाशय गोठल्याचा भास
  3. सातारा : 20 वर्षांनंतरही न्याय मिळणार नसेल तर जगायचं कसं; तारळी धरणग्रस्तांचा सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.