ETV Bharat / state

वांग नदीत वाहून गेलेल्या मुलीचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला - girl death by drowning

वांग नदीच्या पाण्यात वाहून गेलेल्या क्षितीजा साठे (12) या मुलीचा मृतदेह तब्बल चौथ्या दिवशी (रविवारी) सकाळी साडेसातच्या सुमारास मच्छिमारांना आढळून आला.

क्षितीजा
author img

By

Published : Nov 17, 2019, 5:19 PM IST

सातारा - जिल्ह्यातील कराडच्या वांग नदीच्या पाण्यात वाहून गेलेल्या क्षितीजा साठे (12) या मुलीचा मृतदेह तब्बल चौथ्या दिवशी (रविवारी) सकाळी साडेसातच्या सुमारास वांग नदीच्या पात्रात मच्छिमारांना आढळून आला. नदीपात्र ओलांडताना आजोबांसह ३ नाती पाण्यात वाहून गेल्या होत्या, त्यातील तिघांना नागरिकांनी वाचविले होते. मात्र, क्षितीजा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेली होती. तेव्हापासून तिचा शोध सुरू होता. अखेर रविवारी तिचा मृतदेह सापडला.

घटनास्थळी जमलेले नागरिक
घटनास्थळी जमलेले नागरिक

हेही वाचा - नदीपात्र ओलांडताना आजोबांसह तीन नाती गेल्या वाहून; एक मुलगी बेपत्ता

क्षितीजाचा मृतदेह सापडल्याचे कळताच सणबूर (ता. पाटण) या तिच्या गावातील नागरीक आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. वांग-मराठवाडी धरणातून पाणी सोडण्यापूर्वी नदीकाठच्या गावांना पूर्व सूचना देण्यात आली नव्हती. तसेच नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळेच क्षितीजाचा हिचा नाहक बळी गेला आहे. धरण व्यवस्थापनाने या घटनेची जबाबदारी लेखी स्वरूपात स्वीकारावी. तसेच या घटनेस जबाबदार असणार्‍या दोषींवर कारवाई करावी. तरच आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ, अशी भूमिका क्षितीजाच्या नातेवाईकांनी आणि सणबूरच्या ग्रामस्थांनी घेतली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. नंतर लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेन हिरे यांनी घटनास्थळी येऊन संपूर्ण प्रकाराची ८ दिवसात चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच पाटणचे डीवायएसपी अशोकराव थोरात यांनीही पोलीस खात्यामार्फत स्वतंत्र चौकशी करण्याची ग्वाही दिल्यानंतर तणाव निवळला. त्यानंतर सणबूर ग्रामस्थांनी क्षितीजाचा मृतदेह ताब्यात घेतला. दुपारी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

हेही वाचा - राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेत सातारा इंग्लिश मीडियम स्कूलचा डंका

सणबूर (ता. पाटण) येथील शंकर रामचंद्र साठे (73) हे श्रावणी, स्वरांजली आणि क्षितीजा या तीन नातींना घेऊन कुठरे गावातील आपल्या मुलीकडे गेले होते. तेथून ते गुरूवारी परत आपल्या गावाकडे जायला निघाले. जवळच्या मार्गाने गावी पोहोचण्यासाठी त्यांनी मोळावडेवाडी येथील वांग नदीपात्रातून पलीकडे जाण्याचा निर्णय घेतला. शंकर साठे हे आपल्या तीन नातींसमवेत नदीपात्रातून पलिकडे जात होते. मात्र, पैलतिरावर पोहचत असतानाच पाण्याचा प्रवाह वाढला आणि चौघेही पाण्याबरोबर वाहून जाऊ लागले. मुलींचा आरडाओरडा ऐकून तेथून काही अंतरावर असलेल्या चौघा नागरीकांनी नदीपात्रात उड्या मारून आजोबांसह दोन नातींना वाचवले. मात्र, क्षितीजा ही पाण्यात वाहून गेली होती. गेल्या ३ दिवसांपासून तिचा शोध घेणे सुरू होते. मात्र, ती सापडत नसल्याने सातारच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी तिच्या शोध कार्यासाठी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्याची तयारी केली. तसेच महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सुनील भाटीया यांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तमराव भजनावळे यांच्याशी संपर्क साधला होता. परंतु, रविवारी सकाळी साडे ७च्या सुमारास मच्छिमारांना नदीपात्रात क्षितीजाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी ढेबेवाडी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले.

हेही वाचा - मी शरद पवार यांना भेटलो नाही - आमदार गोरे

Intro:वांग नदीच्या पाण्यात वाहून गेलेल्या क्षितीजा साठे या 12 वर्षांच्या मुलीचा मृतदेह तब्बल चौथ्या दिवशी (रविवारी) सकाळी साडे सातच्या सुमारास वांग नदीच्या पात्रात मच्छिमारांना आढळून आला. नदीपात्र ओलांडताना आजोबांसह तीन नाती पाण्यात वाहून गेल्या होत्या. त्यातील तिघांना नागरीकांनी वाचविले होते. मात्र, क्षितीजा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेली होती. तेव्हापासून तिचा शोध सुरू होता. अखेर रविवारी तीचा मृतदेह सापडला. Body:
कराड (सातारा) - वांग नदीच्या पाण्यात वाहून गेलेल्या क्षितीजा साठे या 12 वर्षांच्या मुलीचा मृतदेह तब्बल चौथ्या दिवशी (रविवारी) सकाळी साडे सातच्या सुमारास वांग नदीच्या पात्रात मच्छिमारांना आढळून आला. नदीपात्र ओलांडताना आजोबांसह तीन नाती पाण्यात वाहून गेल्या होत्या. त्यातील तिघांना नागरीकांनी वाचविले होते. मात्र, क्षितीजा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेली होती. तेव्हापासून तिचा शोध सुरू होता. अखेर रविवारी तीचा मृतदेह सापडला. 
   क्षितीचा हिचा मृतदेह सापडल्याचे कळताच सणबूर (ता. पाटण) या तिच्या गावातील नागरीक आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. वांग-मराठवाडी धरणातून पाणी सोडण्यापूर्वी नदीकाठच्या गावांना पूर्व सूचना दिलेली नव्हती. तसेच नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळेच क्षितीचा हिचा नाहक बळी गेला आहे. धरण व्यवस्थापनाने या घटनेची जबाबदारी लेखी स्वरूपात स्वीकारावी. तसेच या घटनेस जबाबदार असणार्‍या दोषींवर कारवाई करावी. तरच आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ, अशी भूमिका क्षितीजाच्या नातेवाईकांनी आणि सणबूर ग्रामस्थांनी घेतली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेन हिरे यांनी घटनास्थळी येऊन संपूर्ण प्रकाराची आठ दिवसात चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच पाटणचे डीवायएसपी अशोकराव थोरात यांनीही पोलीस खात्यामार्फत स्वतंत्त चौकशी करण्याची ग्वाही दिल्यानंतर तणाव निवळला. सणबूर ग्रामस्थांनी क्षितीजाचा मृतदेह ताब्यात घेतला. दुपारी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. 
   सणबूर (ता. पाटण) येथील शंकर रामचंद्र साठे (वय 73) हे श्रावणी, स्वरांजली आणि क्षितीजा या तीन नातींना घेऊन कुठरे गावातील आपल्या मुलीकडे गेले होते. तेथून ते गुरूवारी (दि. 14) परत आपल्या गावाकडे जायला निघाले. जवळच्या मार्गाने गावी पोहोचण्यासाठी मोळावडेवाडी येथील वांग नदीपात्रातून पलिकडे जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. शंकर साठे हे आपल्या तीन नातींसमवेत नदीपात्रातून पलिकडे जात होते. पैलतिरावर पोहचत असतानाच पाण्याचा प्रवाह वाढला आणि चौघेही पाण्याबरोबर वाहून जाऊ लागले. मुलींचा आरडाओरडा ऐकून तेथून काही अंतरावर महिला आणि नागरीक गोधड्या धुवत होते. चौघा नागरीकांनी नदीपात्रात उड्या मारून आजोबांसह दोन नातींना वाचविले. मात्र, क्षितीजा ही पाण्यातून वाहून गेली होती. तीन दिवस तिचा शोध घेण्यात येत होता. ती सापडत नसल्याने सातारच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी तिच्या शोध कार्यासाठी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्याची तयारी केली होती. तसेच महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सुनील भाटीया यांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तमराव भजनावळे यांच्याशी संपर्क साधला होता. परंतु, रविवारी सकाळी साडे सातच्या सुमारास मच्छिमारांना नदीपात्रात क्षितीजाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी ढेबेवाडी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.