ETV Bharat / state

साताऱ्यात हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार उघडणार; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

author img

By

Published : Oct 1, 2020, 8:31 PM IST

5 ऑक्टोंबरपासून सातारा जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू होणार आहे. 50 टक्के इतक्या क्षमतेने चालू ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिलेली आहे. नियमांचे पालन न केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

सातारा प्रशासन
सातारा प्रशासन

सातारा - जिल्ह्यातील हॉटेल, फुड कोर्टस्, रेस्टॉरंट्स आणि बार यांना 50 टक्के इतक्या क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. 5 ऑक्टोंबरपासून हे सर्व सुरु होईल, असे आदेश जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी दिले. कोविड -19 च्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात 31 ऑक्टोंबरपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.

सर्व मार्केट/ दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेमध्ये चालु राहतील. तसेच मेडीकल/औषधांची दुकाने पूर्णवेळ चालू ठेवण्यास परवानगी राहील. पाच पेक्षा जास्त व्यक्ती दुकानात असल्यास किंवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास दुकान तात्काळ बंद करण्याची कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

- हे राहणार बंदच…
- सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इंन्स्टिट्युट
- चित्रपट गृहे, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, थिएटर (मॉल्स व मार्केट कॉम्लेक्समधील), बार, सभागृह, असेंब्ली हॉल
- सर्व सामाजिक, राजकिय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे तसेच मोठ्या संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा
- सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखु इत्यादी सेवन करण्यास मनाई
- सर्व धार्मीक स्थळे व प्रार्थना स्थळे सर्वसामान्यासांठी बंद.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.