ETV Bharat / state

Attempt to Break ATM : जिलेटीनच्या साह्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न ; एका चोरट्यास अटक - Bank of India ATM Karad

विजापूर-गुहागर महामार्गावरील ( Bijapur Guhagar Highway ) कराड नजीकच्या गजानन हौसिंग सोसायटीत पहाटे तीनच्या सुमारास जिलेटीनच्या साह्याने बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न ( Attempt to Break ATM ) केला. मात्र पोलीस वेळेत घटनास्थळी पोहोचल्याने चोरट्याचा प्रयत्न फसला. पोलिसांनी चारपैकी एका चोरट्यास शिताफीने पकडून ठेवले. मात्र, अन्य तिघांनी पोलिसांच्या डोळ्यात स्प्रे मारून ते प्रसार झाले.

Attempt to Break ATM
एटीएम फोडताना प्रयत्न
author img

By

Published : Jul 18, 2022, 11:45 AM IST

Updated : Jul 18, 2022, 11:57 AM IST

सातारा - कराड नजीकच्या गजानन हौसिंग सोसायटीत पहाटे तीनच्या सुमारास जिलेटीनच्या साह्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती वायरलेस ऑपरेटरला मिळताच दामिनी पथकाचे जयसिंग राजगे, सचिन सुर्यवंशी, पोलीस नाईक पाटील आणि होमगार्ड निकम हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी चार जण एटीएम ( Bank of India ATM Karad ) फोडण्याचा प्रयत्न करताना दिसले. चोरट्यांनी पोलिसांच्या डोळ्यात स्प्रे मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याही परिस्थितीत पोलिसांनी झटापट करून एकाला पकडून ठेवले. पोलीस वाहन चालकाने पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पळून गेलेल्या संशयितांच्या शोधासाठी नाकाबंदी लावण्यास सांगून जखमी पोलिसांना रूग्णालयात दाखल केले आहे.

जिलेटीन कांडीच्या वायरमुळे गांभीर्य वाढले- गजानन हौसिंग सोसायटीतील इमारतीच्या सलग तीन गाळ्यांमध्ये बँकेची शाखा आणि एटीएम आहे. तिसर्‍या गाळ्यात असणारे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. एटीएम फोडण्यासाठी जिलेटीनचा वापर केला जाणार होता, हेही स्पष्ट झाले आहे. कारण, एटीएमच्या गाळ्यातून एक लांब वायर बाहेर आणण्यात आली आहे. तसेच त्या गाळ्यात जिलेटीनची कांडी देखील आढळली आहे. त्यामुळे एटीएम फोडण्याचा मोठा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सचिन अशोकराव वाघमोडे (वय 38, रा. आदर्श नगर, काळेवाडी-पुणे) आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल (क्र. एच. एच. 42 डब्ल्यू. 5441) ताब्यात घेतली आहे. अन्य तिघे जण पळून गेले असून त्यांच्या शोधासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच सातारहून श्वान पथक आणि बाँब शोधक-नाशक पथकासही पाचारण करण्यात आले आहे. अशी माहिती पोलीसांनी दिली.

हेही वाचा : पतीसोबत झालं भांडण, 'ती' आली अन् मुलासह कृष्णेत उडी मारणार तेवढ्यात...; कराडमधील थरारक घटना

Last Updated : Jul 18, 2022, 11:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.