ETV Bharat / state

'संजीवन समाधीचे रहस्य' या आक्षेपार्ह पोस्टबाबत 'अंनिस'ची पोलिसांत धाव - संजीवन समाधीचे रहस्य

'श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे रहस्य' या नावाने युट्यूबवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या सहभागाचा खोडसाळ उल्लेख असलेल्या 'व्हिडिओ'वर समितीने तिव्र आक्षेप नोंदवत सायबर पोलिसांकडे धाव घेतली आहे. --

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
author img

By

Published : Jul 15, 2021, 8:35 PM IST

सातारा - 'श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे रहस्य' या नावाने युट्यूबवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या सहभागाचा खोडसाळ उल्लेख असलेल्या 'व्हिडिओ'वर समितीने तिव्र आक्षेप नोंदवत सायबर पोलिसांकडे धाव घेतली आहे.

'संजीवन समाधीचे रहस्य' या आक्षेपार्ह पोस्टबाबत 'अंनिस'ची पोलिसांत धाव

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य -
समितीचे बुवाबाजी संघर्ष विभागाचे कार्यकर्ते व राज्य कार्यकारीणी सदस्य मिलिंद देशमुख यांनी लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबतची माहिती बुवाबाजी संघर्ष विभागाचे राज्य सदस्य प्रशांत पोतदार यांनी दिली. त्यांनी सांगितले, ''काय आहे माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य' या शीर्षकाचा एक लेख सोशल मीडियामधून पसरतो आहे. त्यामध्ये म्हटले की 1972 साली अंधश्रद्धा निर्मूलनवाले लोक आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊलींची समाधी उखडायला निघाले होते. आणि तिथे माऊलींनी त्यांना आपल्या चमत्कारी अस्तित्वाची प्रचिती दिली'. हे निवेदन पूर्णपणे खोटे आहे. अंनिसची बदनामी करण्याच्या हेतूने कुणीतरी काल्पनिक कथा रचून ती सोशल मीडियावर टाकली आहे.

समितीच अस्तित्वात नव्हती -
पोतदार म्हणाले "अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना १९८२ साली झाली. तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना १९८९ साली झाली. या दोन्हीही संघटना १९७२ साली अस्तित्वात नव्हत्या. अंधश्रद्धा निर्मूलनाची दुसरी कोणतीही चळवळ त्या काळात महाराष्ट्रात सुरु नव्हती. निवेदन करणारे म्हणतात की 'एकट्या पुण्यातून दोन-अडीचशे माणसांचा ट्रक पुण्याहून आळंदीला समाधी उखडण्यासाठी चालला होता.' जिथे ५० माणसे मिळणे अवघड होते तिथून अडीचशे माणसे कुठून मिळाली? याचा अर्थ ही कथाच बनावट आहे."

दिशाभूल करणारी माहिती -
त्या लेखात सांगितलेल्या इतर गोष्टीही (अल्फा, बीटा, गॅमा किरण मीटरच्या साहाय्याने मोजणे वगैरे) खोट्या आहेत. ते कथन खरे असते तर समाधी उखडण्यासाठी गेलेल्या लोकांची नावे दिली असती. परंतु तसे झाले नाही. 'अंनिस' विधायक धर्मचिकित्सेला महत्व देते; की जी धर्मचिकित्सेची परंपरा संतानी आपल्या परखड आणि वास्तववादी शैलीतून अभंगातून निर्माण केली. दरवर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने वारकऱ्यांमध्ये व समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या हेतूने अत्यंत चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक तत्सम पोस्ट, व्हिडिओ आदी साहित्य सोशल मीडियाद्वारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नावाने तसेच महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांचा उल्लेख करून पसरवले जातात. अशा अफवांवर जनतेने विश्वास ठेऊ नये. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती हवी असल्यास अथवा सत्यता जाणून घेण्याची इच्छा असल्यास महाराष्ट्र अंनिसच्या सातारा येथील मध्यवर्ती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महा. अंनिसच्या राज्य बुवाबाजी संघर्ष विभागाच्या सदस्य नंदिनी जाधव- पुणे, भगवान रणदिवे-सातारा, केदारीनाथ सुरवसे-सोलापूर, चंद्रकांत उळेकर- उस्मानाबाद, कमलाकर जमदाडे-नांदेड यांनी केले आहे.

हेही वाचा - विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा नैतिक अधिकार मुख्यमंत्र्यांना नाही - प्रवीण दरेकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.