ETV Bharat / state

मेडिकल कॉलेजचा प्रश्न मार्गी लावू - अजित पवार

author img

By

Published : Feb 17, 2020, 3:02 PM IST

साताऱ्यातील शासकिय मेडिकल कॉलेजचा गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी मी येथे आलो आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातून पहिल्या टप्प्यात सुमारे 80 ते 100 कोटी निधी उपलब्ध करण्यान्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

ajit-pawar-said-that-the-question-of-medical-college-will-be-solved
मेडिकल कॉलेजचा प्रश्न मार्गी लावू - अजित पवार

सातारा - मेडिकल कॉलेज लवकर सुरू व्हावे यासाठी साताऱ्यात मीटिंग घेतली आहे. हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सातारा येथील मेडिकल कॉलेजच्या अनुषंगाने विश्रामगृहावर आयोजित बैठकीपूर्वी ते बोलत होते.

साताऱ्यातील शासकिय मेडिकल कॉलेजचा गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी मी येथे आलो आहे. मेडिकल कॉलेजचा आराखडा प्रवेश प्रक्रिया पदनिर्मिती, हॉस्टेलची उभारणी याबाबत चर्चा करून ते अंतिम करण्यासोबतच अर्थसंकल्पातून निधीची तरतूद किती करावी लागेल, याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकित घेतली. राज्याच्या अर्थसंकल्पातून पहिल्या टप्प्यात सुमारे 80 ते 100 कोटी निधी उपलब्ध करण्यान्याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही अजित पवार यांनी सांगितले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, सारंग पाटील आदी उपस्थित होते

मर्ढेकर स्मारकाबाबत चौकशीअंती निर्णय -

मर्ढे (ता.सातारा) येथील कविवर्य बा. सी.मर्ढेकर याच्या स्मारकाचे उद्घाटन अद्याप का झाले नाही, याची माहिती मुंबईत गेल्यानंतर घेऊ. स्मारकाचे काम पूर्ण असूनही अद्याप त्याचे उद्‌घाटन का झाले नाही, स्थानिक आमदार व पालकमंत्री यांनी आजपर्यंत का निर्णय घेतला नाही, असा प्रश्‍न उपस्थित करुन ते म्हणाले, 'हा मुद्दा मंत्रालयातील बैठकीत आपण चर्चेस घेऊन चौकशीअंती निर्णय घेऊ.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.