सातारा - फलटण तालुक्यातील चौधरवाडी येथील दत्तनगर शेतवस्तीवर राहणार्या आरीफा रशीद शेख (वय ४५) वर्षे या महिलेचा राहते घरी खून झाला होता. खून झाल्यानंतर मृत महिलेचा मुलगा सुलतान रशीद शेख (वय -३०) हा फरार झाला होता. तो अंत्यविधीला सुद्धा हजर नव्हता. गेली पाच महिने तो फरार होता. या प्रकरणी सुलतान शेख हा फलटण शहरामध्ये बारामती रोडवर येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर फलटण शहर पोलिसांनी त्याठिकाणहून त्याला ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - मामा-भाचीच्या दुहेरी हत्याकांडाने थरारली उपराजधानी
सुलतान शेख यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने त्यांच्या आईचा खून केल्याची कबुली दिली. आईची वर्तणुक चांगली नसल्याने व तिला दारुचे व्यसन असल्याने रागात भांडणामध्ये कुर्हाडीने खून केल्याचे सांगितले.