ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यातील आणखी चौघे कोरोना पॉझिटिव्ह; तर आठ जण कोरोनामुक्त - कराड कोरोना न्यूज

कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये विंग (ता. कराड) येथील 50 वर्षीय पुरुष आणि तामिणे (ता. पाटण) येथील 7 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. तसेच परळी (ता. सातारा) येथील 21 वर्षांचा तरूण आणि 48 वर्षांच्या पुरुषाचा समावेश आहे.

corona
कोरोना व्हायरस
author img

By

Published : May 29, 2020, 9:53 AM IST

कराड (सातारा) - कराड, पाटण तालुक्यातील दोन आणि सातारा तालुक्यातील दोन, अशा चौघांचा कोरोना अहवाल गुरुवारी रात्री पॉझिटिव्ह आला आहे. तसेच म्हासोली (ता. कराड) येथील 8 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कृष्णा हॉस्पिटलमधून गुरुवारी दुपारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये विंग (ता. कराड) येथील 50 वर्षीय पुरुष आणि तामिणे (ता. पाटण) येथील 7 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. तसेच परळी (ता. सातारा) येथील 21 वर्षांचा तरुण आणि 48 वर्षांच्या पुरुषाचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 426 झाला आहे. 15 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून 134 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

कारोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या म्हासोली गावातील आठ जणांना 50 वर्षीय पुरूष, 16, 17 आणि 18 वर्षीय तरुण, 62 वर्षांचा वृद्ध, 48 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष आणि 35 वर्षीय महिला, अशा 8 रुग्णांना कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर म्हासोली गाव कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले होते.

गुरुवारी आठही रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. आतापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधील तब्बल 68 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.