ETV Bharat / state

माजी नगरसेवकाच्या खासगी सावकारीच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू - मिरज

माजी नगरसेवकाच्या खासगी सावकारीच्या जाचाला कंटाळून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. नगरसेवकाच्या जाचाला कंटाळून तरुणाने मिरज पोलीस ठाण्याच्या आवारात तीन दिवसांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचे आज निधन झाले. मोहसीन बागवान असे या युवकाचे नाव आहे.

मृतक मोहसीन बागवान यांचे छायाचित्र
author img

By

Published : Jun 18, 2019, 5:09 PM IST

सांगली - माजी नगरसेवकाच्या खासगी सावकारीच्या जाचाला कंटाळून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. नगरसेवकाच्या जाचाला कंटाळून तरुणाने मिरज पोलीस ठाण्याच्या आवारात तीन दिवसांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचे आज निधन झाले. मोहसीन बागवान असे या युवकाचे नाव आहे.

मोहसीन बागवान यांचे रुग्णालयात असतांनाचे दृष्य. त्यांचा आज रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

सांगलीच्या मिरजेमध्ये मोहसीन बागवान या तरुणाने मिरज शहर पोलीस ठाण्याच्या आवारात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर मोहसीनला त्याच्या मित्रांनी तातडीने उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. आत्महत्या करण्यापूर्वी मोहसीन बागवान याने एक चिट्ठी लिहिली होती. ही चिट्ठी पोलिसांना सापडली असून यामध्ये त्याने माजी नगरसेवक साजिदअली पठाण व त्याचा भाऊ बबलू पठाण यांच्याकडून २० टक्क्यांनी ५० हजारांचे कर्ज घेतले असल्याचे सांगितले होते. यापोटी आपण १ लाख ७५ हजार रुपये दिले होते. तरी सुद्धा पठाण बंधुंकडून पैशासाठी तगादा लावण्यात आला असून त्यांच्याकडून मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात येत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचा मजकूर चिट्टीमध्ये नमूद केला होता.

यानंतर मिरज पोलिसांनी साजीद पठाण यांच्या घरावर छापा टाकला होता. मात्र, त्यावेळी पठाण बंधू हाती लागू शकले नव्हते. तर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बागवान यांची प्रकृती खालावल्याने त्यांचा आज मृत्यू झाला आहे.

मोहसीन बागवान यांच्या मृत्युमुळे मिरजेमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेनंतर काही वेळातच मिरज पोलिसांनी माजी नगरसेवक साजिद पठाण याला ताब्यात घेतले आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली.

AV .

FEED SEND FILE NAME - MH_SNG_SAVAKRI_JACHA_DEATH_18_JUNE_2019_VIS_1_7203751 - TO - MH_SNG_SAVAKRI_JACHA_DEATH_18_JUNE_2019_VIS_4_7203751

स्लग - माजी नगरसेवकाच्या खाजगी सावकारीच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू..

अँकर - मिरज पोलिस ठाण्याच्या आवारात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला आहे.मिरजेतील माजी नगरसेवकाच्या खाजगी सावकारकीच्या जाचाला कंटाळून मोहसिन बागवान याने तीन दिवसापूर्वी आत्महत्येचा प्रयत्‍न केला होता.त्याच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना आज निधन झालं आहे.तर या प्रकरणी पोलिसांनी माजी नगरसेवक साजिद पठाण याला ताब्यात घेतले आहे.
Body:
व्ही वो - सांगलीच्या मिरजे मध्ये शनिवारी मोहसिन बागवान तरुणाने मिरज शहर पोलीस ठाण्याच्या आवारात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.यानंतर मोहसीनला त्याच्या मित्रांनी तातडीने उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.आत्महत्या करण्यापूर्वी मोहसीन बागवान याने लिहलेली चिट्ठी पोलिसांना सापडली असून यामध्ये त्याने माजी नगरसेवक साजिदअली पठाण व त्याचा भाऊ बबलू पठाण यांच्याकडून २० टक्क्यांनी ५० हजारांचे कर्ज घेतले होते.यापोटी आपण १ लाख ७५ हजार रुपये दिले असताना, पुन्हा पठाण बंधूंच्याकडून पैश्यासाठी तगादा लावून मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात येत,असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचा मजकूर चिट्टीमध्ये नमूद केला होता.यानंतर मिरज पोलिसांनी साजीद पठाण यांच्या घरावर छापा टाकला होता.मात्र त्यावेळी पठाण बंधु हे हाती लागू शकले नव्हते .तर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बागवान यांची प्रकृती खालावून आज बागवान यांचा मृत्यू झाला आहे.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान या घटनेनंतर काही वेळातच मिरज पोलिसांनी माजी नगरसेवक साजिद पठाण याला ताब्यात घेतले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.