ETV Bharat / state

जत तालूक्यात कर्जाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

जत तालुक्यातील शेगाव येथील तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सचिन इराप्पा नाईक असे 32 वर्षीय तरुणाचे मनाव आहे. वाहनकर्जाचा वाढता बोजा असह्य झाल्याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. मयत सचिन यांनी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते.

जत तालूक्यात तरुणाची आत्महत्या
जत तालूक्यात तरुणाची आत्महत्या
author img

By

Published : Jan 11, 2021, 12:06 PM IST

जत (सांगली ) - जत तालुक्यातील शेगाव येथील तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सचिन इराप्पा नाईक असे 32 वर्षीय तरुणाचे मनाव आहे. वाहनकर्जाचा वाढता बोजा असह्य झाल्याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. मयत सचिन यांनी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते.

नैराश्य आणि मानसिक तणावामुळे आत्महत्या
लॉकडाऊनमुळे तब्बल सात महिने धंदा पूर्णपणे बंद होता. तरीही सचिन यांनी उसनवारी करुन हप्ते बिनचूकपणे भरले. परंतू, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर वाहन व्यवसायातील घडी पूर्ववत होत नसल्याचे वाढते नैराश्य आणि मानसिक तणावाने असह्य झाल्याने यांनी आत्महत्येचा दुर्दैवी निर्णय घेतला.

कुटुंबातील कर्ता पुरूष गेला
सचिन नाईक यांचे कुटूंबात आई, वडील,पत्नी,दोन लहान मुले आणि एक भाऊ असा परिवार आहे. कुटूंबातील कर्ता पुरुष गेल्याने हे कुटूंब उघड्यावर पडले आहे. शासनाने या कुटूंबाला त्वरित आर्थिक मदत देण्याची गरज तर आहे. लॉकडाऊनच्या काळात देखील सचिनने फायनान्सचे हप्ते प्रामाणिकपणे बिनचूक भरले. मात्र, ऐन लॉकडाऊनच्या कालावधीत सात महिने वाहन धंदा बंद असतानाही सचिन यांनी संबंधित फायनान्स कंपनीविरुध्द कुठेही तक्रार न करता खाजगी उसनवारी करुन सर्व हप्ते प्रामाणिकपणे बिनचूक भरले आहेत. त्यामुळे या कंपनीने देखील हे कुटूंब सावरण्यासाठी आर्थिक भार उचलावा, अशी मागणी कुटूंबियांनी केली आहे.

हेही वाचा - नवीन कृषी कायद्यांबाबत सर्वोच्च न्यायालयात आज होणार सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.