सांगली - चांदोली धरणात पावसाचा जोर ओसरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करून 2 हजार 517 पर्यंत कमी करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती वारणा पाटबंधारे शाखा अधिकारी टी.एस.धामणकर यांनी दिली आहे.
मागील आठ दिवसांपासून वारणा धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने रविवार पर्यंत 4 हजार 303 क्युसेक सांडव्यावरून, 1 हजार 374 क्युसेक पाॅवर हाऊसयेथून असे एकूण 5 हजार 677 विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत होता. मात्र सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे
आज सकाळी 10.00 वाजता पाण्याचा वसर्ग कमी करण्यात आला.
सांडव्या वरून 1 हजार 143, पाॅवर हाऊस येथून 1 हजार 374 असा एकूण 2 हजार 517 विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आल्याची माहिती वारणा पाटबंधारे विभागातील शाखाधिकाऱ्यांनी दिली.