ETV Bharat / state

Sangli Accident : देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, भीषण अपघातात पाच ठार

बुलेरो, ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील पाच जण ठार तर तीन जखमी झाल्याची घटना घडली आहे. रत्नागिरी-पंढरपूर मार्गावर मिरजजवळ सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. तीन पुरुष, एक 12 वर्षांचा मुलगा, एक महिला या अपघातात ठार झाले आहे.

Sangli Accident
Sangli Accident
author img

By

Published : May 17, 2023, 5:38 PM IST

बुलेरो, ट्रॅक्टर यांच्यात अपघात

सांगली : बोलेरो गाडी आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात होऊन एकाच कुटुंबातील पाच जण जागेचे ठार झाले आहेत. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये दोन महिलांचा आणि तीन पुरुषांचा समावेश आहे, यामध्ये एक बारा वर्षे मुलगा देखील ठार झाला आहे. ज्यामध्ये जयवंत पवार, आर्यन पवार, साक्षी पवार, वय (19), सोहम पवार, (वय 12) आणि श्रावणी पवार, (वय 16) अशी मृतांची नावे आहेत.

पवार कुटुंबावर हा काळाचा घाला : मिरज तालुक्यातल्या वटी नजीक असणाऱ्या रत्नागिरी नागपूर महामार्गावर हा भीषण अपघात घडला आहे. मृत, जखमी हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातल्या सरवडे गावचे आहेत. पंढरपूरला देवदर्शनासाठी जात असताना पवार कुटुंबावर हा काळाचा घाला पडला आहे.

असा झाला अपघात : मिरज शहराला बायपास असणाऱ्या रत्नागिरी - नागपूर महामार्गावरील वड्डी बोलेरो गाडी, विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातल्या सरवडे गावातील पवार कुटुंबीय हे पंढरपूर या ठिकाणी देवदर्शनासाठी बोलेरो गाडीतून निघाले होते. बाराच्या सुमारास पवार यांची बलेरो गाडी ही मिरज नजीक असणाऱ्या वड्डी हद्दीत पोहचली असता, समोरून विरुद्ध चुकीचे दिशेने विटाने भरलेलं ट्रॅक्टर अचानक समोर आला.

यावेळी समोरून आलेल्या बोलेरो गाडीचा चालकाचा ताबा सुटला. त्यांनतर भरधाव बोलेरो गाडी ट्रॅक्टरवर जाऊन आदळली. या झालेल्या भीषण अपघातामध्ये गाडीमध्ये असणारे आठ व्यक्तींपैकी पाच जण जागीच ठार झाले आहेत. जखमींना मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बोलेरो कोल्हापूरहून रत्नागिरीच्या दिशेने जात होती. अधिकाऱ्याने सांगितले की, विरुद्ध दिशेने जाणारा एक ट्रॅक्टर विटा घेऊन जात होता. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

  • वाचा -
  1. Narendra Modi To Visit Japan : पंतप्रधान नरेंद्र मोदी शिखर परिषदेसाठी जपान, ऑस्ट्रेलियासह जाणार चार देशांच्या दौऱ्यावर
  2. Karnataka CM : दिल्लीत घडामोडींना वेग, सिद्धरामय्या-शिवकुमार खरगेंना भेटले
  3. PM Narendra Modi On Rozgar Mela : सरकारचे प्रत्येक धोरण रोजगार निर्मितीचे दार उघडणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.