ETV Bharat / state

सांगलीत कोरोनाचे ३ नवे रुग्ण वाढल्याने संख्या १४६ वर; ६ जण झाले कोरोनामुक्त - तीन कोरोना रुग्ण वाढले

जिल्ह्यात दिवसभरात ३ नवीन कोरोना रुग्ण वाढल्याने एकूण रुग्णसंख्या १४६ वर पोहोचली आहे. आतापर्यंत ८७ जण कोरोनामुक्त झाले असून ५४ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे जिल्ह्यातील ५ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

sangli corona update
सांगली कोरोना अपडेट
author img

By

Published : Jun 6, 2020, 3:49 PM IST

सांगली - जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे ३ नवे रुग्ण आढळले असून ६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कडेगावातील नेर्ली, वाळव्यामधील वाटेगाव आणि पलूस येथील एक जण अशा तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अ‌ॅक्टिव्ह रुग्णसंख्या ५४ तर एकूण रुग्णसंख्या १४६ झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शनिवारी दुपारपर्यंत जिल्ह्यात आणखी तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईहून आलेल्या कोरोनाबाधितांच्या संपर्कात हे तिघे जण आहेत. शनिवारी कोरोना लागण झालेल्या पैकी कडेगाव तालुक्यात नेर्ली येथील ५० वर्षीय पुरुष,वाळवा तालुक्यातल्या वाटेगाव येथील ५५ वर्षीय पुरुष आणि पलूस तालुक्यातील ५८ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. दुसरीकडे कोरोना उपचार घेणारे सहा रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये शिराळा तालुक्यातल्या निगडी येथील ३० वर्षीय तरुण, रिळे येथील ३५ वर्षीय तरुण आणि चिंचली येथील ४३ वर्षीय व्यक्ती आणि जत तालुक्यातल्या वाळेखिंडी येथील ३५ वर्षीय तरुण, आटपाडी तालुक्यातल्या बेनापूर येथील दहा वर्षीय मुलगी आणि खानापूर तालुक्यातल्या गोरेवाडी येथील ४५ वर्षीय व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांच्यावर मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन १४ दिवसांसाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात आले आहे.

सांगली जिल्ह्यातील अ‌ॅक्टिव कोरोना रुग्णांची संख्या ही ५४ झाली एकूण संख्या १४६ झाली आहे. १४६ पैकी ८७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुळे जिल्ह्यातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.