ETV Bharat / state

सराफा दुकान फोडणारी टोळी गजाआड, पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त - police

सांगलीमधील विटा येथे सूर्या आर्ट्स नावाचे सुवर्ण कारागीराचे दुकान आहे. गेल्या १० मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडले. तसेच २ लाख ४० हजारांच्या रोख रकमेसह सोन्याचे दागिने, असा एकूण ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.

अटक केलेले आरोपी
author img

By

Published : May 17, 2019, 9:06 AM IST

सांगली - सुवर्ण कारागिराचे दुकान फोडून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा विटा पोलिसांनी छडा लावला आहे. याप्रकरणी चार जणांना गजाआड करण्यात आले आहे. त्यांच्याकडून जवळपास चार लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

कारवाईबद्दल माहिती देताना पोलीस अधिकारी

सांगलीमधील विटा येथे सूर्या आर्ट्स नावाचे सुवर्ण कारागीराचे दुकान आहे. गेल्या १० मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडले. तसेच २ लाख ४० हजारांच्या रोख रकमेसह सोन्याचे दागिने, असा एकूण ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या चोरीचा पुरावा नष्ट करण्यासाठी दुकानात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणा उध्वस्त करण्यात आली होती. यामुळे शहरातील सराफा बाजारात घडलेल्या या धाडसी चोरीमुळे सराफा व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. तसेच या चोरीचा छडा लावणे विटा पोलिसांसमोर खूप मोठे आव्हान होते. अखेर विटा पोलिसांनी या चोरीचा तपास करत अवघ्या ३ दिवसांत चोरीचा उलगडा केला आहे.
चोरीप्रकरणी अमोल शहाजी शिरतोडे, आनंदा गणपत आडके, राजेंद्र रामचंद्र मोहिते, संतोष भिमराव जावीर या सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्याकडून चोरीत लुटण्यात आलेला पावणेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

AVB

Feed send file name -MH_SNG_TOLI_ARREST_16_MAY_2019_VIS_1_7203751 - TO - MH_SNG_TOLI_ARREST_16_MAY_2019_VIS_2_7203751 -
MH_SNG_TOLI_ARREST_16_MAY_2019_BYT_1_7203751

स्लग - घरफोडी करणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या ,चौघांना अटक करत पावणेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत..

अँकर - विट्यातील सुवर्ण कारागीराचे दुकान फोडून रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा विटा पोलिसांनी छडा लावला असून चौघांना गजाआड करत पाऊणे पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी सराफा बाजारात ही धाडसी चोरीची घटना घडली होती.Body:व्ही वो - सांगलीच्या विटा येथील सुर्या आर्टस सुवर्ण कारागीर दुकानाचे १० मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 2 लाख 40 हजारांच्या रोख रक्कमेसह सोन्याच्या दागिने असा एकूण तब्बल 6 लाख 20 हजारांचा ऐवज लंपास केला होता.तर या चोरीचा पुरावा नष्ट करण्यासाठी दुकानात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणा उध्वस्त करण्यात आली होती.यामुळे शहरातील सराफ बाजारात घडलेल्या या धाडसी चोरीमुळे सराफा व्यवसायिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.तर या चोरीचा छडा लावणे ही विटा पोलिसांसमोर होते.अखेर विटा पोलिसांनी या चोरीचा गतीने तपास करत अवघ्या तीन दिवसात विटा पोलिसांनी चोरीचा उलगडा केला आहे.या चोरीप्रकरणी अमोल शहाजी शिरतोडे (रा. लेंगरे),आनंदा गणपत आडके, राजेंद्र रामचंद्र मोहिते, संतोष भिमराव जाविर (तिघे रा. जोंधळखिंडी) या सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली आहे.यावेळी त्यांच्याकडून चोरीत लुटण्यात आलेला पावणेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती विटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली आहे.

बाईट - रवींद्र शेळके - पोलीस निरीक्षक, विटा पोलीस ठाणे.विटा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.