सांगली - महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रभाव वाढतच चालला आहे. राज्यातील डॉक्टर, इंटर्न डॉक्टर, वरिष्ठ डॉक्टर असे सगळेच जीवाची बाजी लावत कोरोनाशी लढा देत आहेत. एतवडे खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या वतीने रक्तदान शिबीर करण्यात आले आहे.
कोरोनाची रुग्ण संख्या वाढतच चालल्याने रक्ताचा तुडवडा भासत असल्याने ऐतवडे खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या वतीने रक्तदान सारखा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात दररोज निर्जंतुकीकरणाच्या फवारण्या सुरु असून गावात बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंद केला आहे.
वाळवा तालुक्यातील इस्लामपूरमध्ये 28 कोरोनाचे रुग्ण सापडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. रक्ताची अडचण निर्माण होऊ नये म्हणून, वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील उपसरपंच संभाजी पाटील यांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायतीच्या वतीने रक्तदान शिबीर राबवले.