सांगली - कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या भितीने निखिल लक्ष्मण भानुसे (वय २८) या तरुण अभियंत्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार इटकरे ता. वाळवा येथे घडला आहे. सध्या सांगली जिल्ह्याबरोबर वाळवा तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याने वाळवा तालुक्यात भीतीचे वातावर निर्माण झाले आहे. तर ही दुर्दैवी घटना बुधवारी रात्री उशिरा घडली.
निखिल हा सिव्हिल इंजिनियर होता. तीनच महिन्यापुर्वी त्याचा विवाह झाला होता. तर चार दिवसांपुर्वी त्याला कोरोनाचा संसर्ग होऊन त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने तो अस्वस्थ होता. याच नैराश्यातून त्याने बुधवार (दि 14 रोजी) रात्री उशीरा घरासमोरील जनावारांच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे परिसरात हळहळ वेक्त होत आहे. याप्रकरणी कुरळप पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.