सांगली - बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानांतर्गत इस्लामपूरमध्ये राज्यस्तरीय महामॅरेथॉन स्पर्धा पार पडली. यावेळी हजारो स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. इस्लामपूरच्या सर्जेराव यादव स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीने ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
हेही वाचा... बीडमध्ये राजकारण पेटलं; विनायक मेटेंनी घरात घुसून धमकावल्याचा पं. स. सदस्याच्या दिराचा आरोप
इस्लामपूरमध्ये बुधवारी राज्यस्तरीय महामॅरेथॉन स्पर्धा पार पडली. इस्लामपूरच्या सर्जेराव यादव स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीने या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बेटी पढाओ, बेटी बचाओ या अभियाना अंतर्गत ही महामॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तसेच नागरिकांमध्ये आरोग्य आणि व्यायामाबद्दल जागृती व्हावी, या उद्देशाने देखील स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे यांसह राज्यातील 1800 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. एकूण तीन 3 वयोगटामध्ये 10 किलोमीटर, 5 किलोमीटर अशा 2 प्रकारांत या मॅरेथॉन स्पर्धा पार पडल्या.
हेही वाचा.... जामियामधील नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलनामागे 'आयएसआय'चा हात