ETV Bharat / state

भरधाव ट्रकच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू, संतप्त जमावाच्या मारहाणीत ट्रक चालक ठार - संतप्त जमाव

सांगलीत हरिपूर रोड येथे शनिवारी रात्री अपघात झाला. या अपघातात ६ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला आहे.

रुचा धेंडे
author img

By

Published : Jun 2, 2019, 7:37 AM IST

Updated : Jun 2, 2019, 1:19 PM IST

सांगली - हरिपूर रोड, काळी वाट येथे शनिवारी रात्री भरधाव ट्रकने एका दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात रुचा सुशांत धेंडे (६) या चिमुरडीचा मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त जमावाकडून ट्रक चालकास बेदम मारहाण करण्यात आल्यामुळे यात त्याचाही जागीच मृत्यू झाला आहे.

अपघात झालेली वाहने

अपघातानंतर चालकाचा ताबा सुटून ट्रक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कमानीला धडकला. अपघातानंतर मुलीचा जागीच मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्याठिकाणी असणाऱ्या जमावाने ट्रकवर हल्ला केला. तसेच ट्रकची तोडफोड करत चालकास बाहेर ओढून बेदम मारहाण केली. यावेळी चालकास दगडाने मारहाण करण्यात आल्याने कुमार आळगेकर (४५) या चालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सांगली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिले.

अपघातात रुचाची आई आणि अन्य एक मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संदिपसिंह गिल, पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील, पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

Av

Feed send file name - MH_SNG_ACCIDENT_02_JUNE_2019_VIS_1_7203751 - TO -
MH_SNG_ACCIDENT_02_JUNE_2019_VIS_4_7203751

स्लग - भरधाव ट्रकच्या धडकेत चिमुरडी ठार, सतंप्त जमावाच्या मारहाणीत ट्रक ड्रायव्हरचा मृत्यू ..

अँकर - एका भरधाव ट्रकच्या धडकेत ६ वर्षीय चिमुरडी ठार झाली आहे.तर या घटनेनंतर संतप्त जमावाकडून ट्रक चालकास बेदम मारहाण करण्यात आल्याने ट्रक ड्रायव्हरचाही जागीच मृत्यू झाला आहे.सांगलीच्या हरिपूर रोडवर ही घटना घडली आहे. Body:सांगलीच्या हरिपूर रोड, काळी वाट येथे भरधाव ट्रकने दुचाकीला मागून दिलेल्या धडकेत रुचा सुशांत धेंडे (वय 6) ही चिमुरडी ठार झाली आहे.शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.अपघाता नंतर चालकाचा ताबा सुटून ट्रक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कमानीला धडकला.तर मुलीचा जागीच मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्याठिकाणी असणाऱ्या जमावाने ट्रकवर हल्लाबोल करत ट्रकची तोडफाड करत चालकास बाहेर ओढून बेदम मारहाण करण्यास सुरवात केली.ज्या मध्ये दगडाने मारहाण करण्यात आल्याने कुमार आळगेकर वय,45 या चालकाचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच सांगली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणले.व दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिले.तर या अपघातात रुचा धेंडे याची आई व अन्य एक मुलगी किरकोळ जखमी झाली आहे.
तर या अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक संदीपसिंह गिल, पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील,पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
Conclusion:
Last Updated : Jun 2, 2019, 1:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.