ETV Bharat / state

शिवप्रतिष्ठानचा NRC-CAA समर्थनार्थ मोर्चा; कायद्याला विरोध करणाऱ्या हिंदूंवर संभाजी भिडेंची टीका

NRC आणि CAA च्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठानने शहरात मोर्चा काढला. याप्रसंगी भिडेंनी या कायद्यांना विरोध करणाऱ्या हिंदूंवर टीकेची झोड उठवली. या मोर्चात भाजपचे पदाधिकारी व शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

bhide
शिवप्रतिष्ठानचा NRC-CAA समर्थनार्थ मोर्चा
author img

By

Published : Dec 30, 2019, 5:30 PM IST

सांगली - NRC आणि CAA कायद्याला विरोध करणारऱ्या भारतीय हिंदूंना वंधत्व आणि नपुंसकता आली आहे, असे वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले आहे. NRC आणि CAA च्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठानने शहरात मोर्चा काढला. याप्रसंगी भिडेंनी या कायद्यांना विरोध करणाऱ्या हिंदूंवर टीकेची झोड उठवली. या मोर्चात भाजपाच्या खासदार आणि आमदारांनी सहभाग घेतला होता.

NRC-CAA कायद्याला विरोध करणाऱ्या हिंदूंवर संभाजी भिडेंची टीका

राम मंदिरापासून निघालेल्या मोर्चाची सांगता मारूती चौकात जाहिर सभेने करण्यात आली. यावेळी, उपस्थितांना संबोधित करताना भिडे म्हणाले,"भारताला गांधी बाधा रोगाने ग्रासले आहे. हिंदू समाजात अपार नपुंसकता आणि राष्ट्रीयत्वाचा अभाव आहे"

हेही वाचा - राष्ट्रीयत्वाबाबत हिंदू 100 टक्के नपुंसक आणि वांझ- संभाजी भिडे गुरुजी

या मोर्चात भाजप खासदार संजय पाटील, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, मिरजेचे आमदार सुरेश खाडे, माजी राज्य मंत्री लक्ष्मण ढोबळे, सांगलीच्या महापौर संगीता खोत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Intro:File name -mh_sng_03_shivpratishthan_morcha_vis_01_7203751 - mh_sng_03_shivpratishthan_morcha_byt_04_7203751

स्लग - भारताला 'गांधी बाधेचा' रोग - सभाजी भिडे गुरुजींची टीका,NRC व CAA समर्थनार्थ शिवप्रतिष्ठानने काढला मोर्चा..

अँकर - भारताला 'गांधी बाधा' रोग झाला आहे,अशी टीका शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केली आहे, तसेच राष्ट्रीय नागरिकत्व विधयेकाला विरोध करणाऱ्या हिंदू समाजावर भिडे यांनी पुन्हा टीकेचे झोड उठवले आहे.केंद्र सरकारच्या NRC व CAA कायद्याच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठाच्यावतीने सांगलीत काढण्यात आलेल्या मोर्चा प्रसंगी ते बोलत होते. तर भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात भाजपाचे खासदार आणि आमदारांनी सहभाग घेतला होता.Body:केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नागरिक दुरुस्ती आणि राष्ट्रीय नोंदणी विधेयकाला देशाभर विविध पातळ्यांवर मोठा विरोध होत आहे.तर दुसऱ्याबाजूला या कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चे निघत आहेत. आणि सांगलीत ही या कायद्याच्या समर्थनार्थ आज शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने मोर्चा काढण्यात आला. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला.
या कायद्याची जाहीर माहिती देत राम मंदिर पासून शहरातील प्रमुख मार्गावरून मारुती चौक पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.त्यानंतर जाहीर सभेने या मोर्च्याची सांगता झाली.यावेळी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी बोलताना देशाला स्वतंत्र करण्यासाठी क्रांतिकारकांनी आपल्या आयुष्याचे होम केले,पण शेवटी पूजनीय महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाला स्वातंत्र्य मिळाले ,आणि तो जो गांधी बाधा रोग या देशाला मिळाला,आणि गांधी,म्लेंच्छ या बाधेच्या रोग नामशेष करणारा मंत्र
छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज यांच्या बीज मंत्रात आहे,असे सांगताना.
या नागरिकत्व कायदयाला विरोध करणाऱ्या हिंदू समाजावर टीका करताना हिंदू समाजात राष्ट्रत्व नाही,त्यांच्यात कमजोरी,नपुंसकत्व आपर आहे,अश्या शब्दात भिडे गुरुजी यांनी NRC व CAA
कायद्याला विरोध करणाऱयांवर निशाणा साधला आहे.

शिवप्रतिष्ठानच्या या मोर्चात जिल्ह्यातील भाजपा आणि विविध हिंदुत्ववादी संघटना सुद्धा सहभागी झाले होते.भाजपा खासदार संजयकाका पाटील,सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ,मिरजेचे आमदार सुरेश खाडे,माजी राज्य मंत्री लक्ष्मण ढोबळे,सांगलीच्या महापौर संगीता खोत यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.तर शिवप्रतिष्ठानच्या या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

बाईट - संभाजी भिडे गुरुजी - शिवप्रतिष्ठान ,संस्थापक.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.