ETV Bharat / state

Gopichand Padalkar Brothers : जेसीबी लावून मध्यरात्री सात मालमत्तांवर चालविला बुलडोजर; आमदार गोपीचंद पडळकरांच्या बंधूंचे कृत्य असल्याचा आरोप - Allegation On MLA Gopichand Padalkar Brothers

मिरज शहरात मध्यरात्री जेसीबीच्या साह्यायाने दुकाने आणि घरे पाडण्यात (Shops and houses demolished) आली. हजार लोकांची टोळी घेऊन जागेचा ताबा घेण्यासाठी पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) आले होते, असा आरोप नागरिकांनी केला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तरी याठिकाणी अतिक्रमण पाडण्याच्या (accused of demolishing property) या घटनेमुळे नागरिकांच्या मधून संताप व्यक्त करण्यात आला.

Allegation On MLA Gopichand Padalkar Brothers
संजीव झाडे, पोलीस निरीक्षक ,मिरज शहर
author img

By

Published : Jan 7, 2023, 2:16 PM IST

Updated : Jan 7, 2023, 5:05 PM IST

संजीव झाडे, पोलीस निरीक्षक ,मिरज शहर

सांगली : मिरज शहरात मध्यरात्री दुकाने आणि हॉटेल जेसीबीच्या साह्याने पाडण्यात आली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रोडवर असणाऱ्या ख्वाजा वसाहत जवळ येथे हा प्रकार घडला आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांचे बंधू जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मानंद पडळकर (ZP Member Brahmanand Padalkar) यांनी बेकायदेशीरपने जागेचा ताबा घेण्याच्या उद्देशाने ही सात मिळकती पाडल्याचा आरोप (accused of demolishing property) नागरिकांनी केला आहे. ज्यामध्ये रस्त्या शेजारील दोन हॉटेल, एक मेडिकल स्टोर, ट्रॅव्हल, ऑफिस,एक घर, पान शॉप अशा सात मिळकती मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास पाडण्यात आली आहेत.

नागरिकांचा पडळकरांवर आरोप : मध्यरात्री 5 ते 6 जेसीबीच्या साह्यायाने ही दुकानं आणि घर पाडली आहेत. हजार लोकांची टोळी घेऊन जागेचा ताबा घेण्यासाठी पडळकर आले होते,असा आरोप नागरिकानी केला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तरी याठिकाणी अतिक्रमण पाडण्याच्या या घटनेमुळे नागरिकांच्या मधून संताप व्यक्त करण्यात आला आणि नागरिकांनी रस्त्यावर उतरत जेसीबी दगड देखील केली ज्यामध्ये जेसीबीच्या दर्शनी भागाच्या काचा फुटल्या आहेत. दरम्यान या घटनेने परिसरात आता तणावाचे वातावरण आहे.

महापालिका प्रशासनाकडून नोटीस : मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडचे सध्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील अतिक्रमण गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाकडून पाडण्यात येत आहेत. याच रस्त्यावर एसटी स्टँड नजिक असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील असणारी 55 गुंठे जागा आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर आणि महेश कारंडे नामक व्यक्तीचे असून त्यांचे जागेवरील असणारे अतिक्रमण 24 तासात पाडावे, अशी नोटीस महापालिका प्रशासनाकडून बजावण्यात आली होती. अशा आशयाचे पत्र आता समोर आले आहे.

पोलिसात गुन्हा दाखल : दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे रुंदीकरण यासाठी जागा आधीच हस्तांतर झालेली आहे. मात्र बेकायदेशीररित्या जागा ताब्यात घेण्यासाठी हा सर्व प्रकार करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. याप्रकरणी विशाल सनमुखे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह शंभर जणांच्या विरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे, जमवाबंदी भंग, बेकायदेशीररित्या बांधकाम पाडणे, मारहाण करणे, अश्या स्वरूपाची गुन्हे दाखल करण्यात आली आहेत.

Last Updated : Jan 7, 2023, 5:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.