सांगली - वाळवा तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतींच्या कारभाऱ्यांची आरक्षण सोडत शुक्रवारी (२९ जानेवारी) जाहीर झाली. यामध्ये काही गावांना खुशी, तर कही गावांना गमची अनुभूती आली. अनेक मोठ्या गावांमधील कारभाऱ्यांचा भ्रमनिरास झाला. तर, काही गावांमधील आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी झाल्याने कारभाऱ्यांची गेल्या काही वर्षांची प्रतिक्षा संपली आहे.
हेही वाचा - विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे काम बंद ठेवून धरणे आंदोलन
गावनिहाय सरपंच आरक्षण पुढील प्रमाणे
खुले प्रवर्ग सर्वसाधारण -
साटपेवाडी, बोरगाव, कारंदवाडी, रोझावाडी, ओझर्डे, रेठरेधरण, कामेरी, जक्राईवाडी, कार्वे, येलूर, देवर्डे, दुधारी, अहिरवाडी, फार्णेवाडी (बोरगाव), धोत्रेवाडी, माणिकवाडी, महादेवाडी, नायकलवाडी, जांभुळवाडी, विठ्ठलवाडी, मरळनाथपूर, ठाणापुडे, शिरटे, फार्णेवाडी (सी), पोखर्णी, नेर्ले, ढगेवाडी, चिकुर्डे.
सर्वसाधारण महिला -
कि.म गड, लवंडमाची, ताकारी, जुनेखेड, गोटखिंडी, भडकंबे नागाव, कोरेगाव, शिगाव, काळमवाडी, घबकवाडी, मालेवाडी, भरतवाडी, कणेगाव, गौंडवाडी, गाताडवाडी, येवलेवाडी, वाघवाडी, शेखरवाडी, डोगंरवाडी, बेरडमाची, मिरजवाडी, फाळकेवाडी, काकाचीवाडी, बागणी, शेणे, केदारवाडी, लाडेगाव.
अनुसूचित जाती सर्वसाधारण -
शिरगाव, ढवळी, इटकरे, बहादूरवाडी, वाळवा
अनुसूचित जाती (महिला) -
भाटवाडी, कुंडलवाडी, येडेमच्छिंद्र, भवानीनगर, खरातवाडी, मसूचीवाडी.
अनुसूचित जमाती (महिला) -
तांदूळवाडी.
नागरिक मागास प्रवर्ग सर्वसाधारण -
बहे, करजंवडे, पेठ, कुरळप, तुजारपूर, सुरूल, वशी, कोळे, ताबंवे, कापूसखेड, ऐतवडे बुद्रुक, ऐतवडे खुर्द, पडवळवाडी
नागरिक मागास प्रवर्ग महिला -
कासेगाव, शिवपुरी, नवेखेड, बिचूद, बनेवाडी, वाटेगाव, येडेनिपाणी, रेठरेहरणाक्ष, हुबालवाडी, नरसिंहपूर, साखराळे, बावची, मर्दवाडी.
हेही वाचा - प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचे निधन, वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास