सांगली - मिरज तालुक्यातील बामणी येथे बेकायदा सुरु असलेल्या हातभट्टी दारु अड्ड्यावर छापा टाकाला. यावेळी पोलिसांनी तब्बल 72 हजार रूपयांचा दारूसाठा जप्त केला आहे.
सांगलीच्या मिरज ग्रामीण पोलिसांनी मिरज तालुक्यातील बामणी येथे सुरू असलेल्या बेकायदा हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकून 72 हजारांची दारु जप्त केली. एका काटेरी झुडपात हा हातभट्टी दारुचा अड्डा चालवला जात होता. ही माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून 40 लिटर हातभट्टी 3 हजार 500 लिटर कच्चा माल, असा एकूण 72 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात सांगली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आाला आहे.