सांगली : आगामी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल,अशी संकेत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले आहेत. त्याचबरोबर विरोधकांच्या टीकेला आम्ही कामातून उत्तर देण्याचा ठरवले. त्या दृष्टीने आमचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आमचे कामच बोलेल,असा टोला देखील मंत्री शंभूराजे देसाई यांनी विरोधकांना लगावला आहे. ते सांगलीच्या विटा येथे शिवसेनेचे शिंद गटाचे आमदार अनिल बाबर यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिर प्रसंगी बोलत होते.
महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विटामध्ये हजारो रुग्णांसाठी मोफत सर्वरोग निदान महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते विटा याठिकाणी पार पडले. या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवत या आरोग्य शिबिराला शुभेच्छा दिल्या. खानापूर तालुक्यातील गाव खेड्यातील गरजू लोकांसाठी हे आरोग्य शिबिर फायदेशीर ठरेल,अशा भावना यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलताना व्यक्त केली.
शिबिरात रुग्णांची तपासणी : या आरोग्य शिबिर आयोजित केल्याबद्दल देसाई यांनी आमदार अनिल बाबर यांचे आभार मानले. बाळासाहेबांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन व विट्याचा राजा गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी सुमारे दीडशेहून अधिक आरोग्य अधिकारी, तज्ञ डॉक्टर, परिचारिका,आरोग्य सेवक,आशा सेविका व 500 स्वयंसेवक या महाआरोग्य शिबिरासाठी कार्यरत होते. शिबिरात तज्ज्ञ वैद्यकीय डॉक्टरांच्या मार्फत रुग्णांची तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विटा येथे मोफत महाआरोग्य सर्वरोग निदान तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात हजारो रुग्णांनी नोंदणी करत तपासणी करुन घेतली.
मंत्रीमंडळ विस्ताराचे संकेत : यावेळी उत्पादन शुल्क मंत्री शुंभराजे देसाई यांना मंत्रीमंडळ विस्ताराबाबत विचारले असता,ते म्हणाले,हा विषय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अखत्यारीतील आहे, पण आगामी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी संकेत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले आहेत. त्याचबरोबर विरोधकांच्या टीकेला आम्ही कामातून उत्तर देण्याचा ठरवले आहे. त्या दृष्टीने आमचे काम सुरू आहे. त्यामुळे आमचे कामच बोलेल, असा टोला देखील मंत्री शंभूराजे देसाई यांनी विरोधकांना लगावला आहे.
संजय राउत यांच्यावर टीका : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून दररोज राज्य सरकारवर होणाऱ्या टिकेकर बोलताना, मंत्री शंभुराजे देसाई म्हणले, संजय राऊत सकाळी बडबडताना, किती लोक टीव्ही चॅनल बंद करतात याचा सर्व्हे मीडियाने करायाला हवा. राऊत बोलायला लागले की लोक चॅनल बदलतात. हा आपला अनुभव आहे, असा टोला शंभूराजे देसाई यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून होणाऱ्या दररोजच्या टीकेवर लगावला आहे.
हेही वाचा - Ravikant Tupkar Self Immolation : रविकांत तुपकर यांनी केला आईसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न; ओतले अंगावर पेट्रोल