ETV Bharat / state

लाॅकडाऊन इफेक्ट : इतिहासात पहिल्यांदाच हळदीची ऑनलाईन विक्री - सांगली कोरोना बातमी

कोरोनाच्या प्रार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने सर्व बाजार समित्या आणि त्यातील सौदे बंद आहेत. जागतिक हळदीची बाजारपेठ असणारी सांगलीची कृषी उत्पन्न बाजार समितीही बंद होती. याठिकाणी प्रामुख्याने हळदीचे खरेदी-विक्री होत असते. राज्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, तामिळनाडू अशा अनेक राज्यातील हळद याठिकाणी विक्रीसाठी शेतकरी घेऊन येतो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सर्व सौदे बंद पडले होते.

online-sale-of-turmeric-in-sangli
online-sale-of-turmeric-in-sangli
author img

By

Published : Apr 29, 2020, 4:30 PM IST

सांगली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या जागतिक हळदीची बाजारपेठ पुन्हा सुरू झाली आहे. सांगलीच्या बाजार समितीमध्ये बुधवारपासून गर्दी टाळत हळदीचे ऑनलाईन सौदे सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सव्वा महिन्यानंतर हळद सौदे सुरू करण्यात आले आहेत.

इतिहासात पहिल्यांदाच हळदीची ऑनलाईन विक्री...

हेही वाचा- Global COVID-19 Tracker: जगभरात ३१ लाख ३८ हजार बाधित, तर २ लाख १७ हजार ९८५ दगावले

कोरोनाच्या प्रार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने सर्व बाजार समित्या आणि त्यातील सौदे बंद आहेत. जागतिक हळदीची बाजार पेठ असणारी सांगलीची कृषी उत्पन्न बाजार समितीही बंद होती. याठिकाणी प्रामुख्याने हळदीचे खरेदी-विक्री होत असते. राज्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, तामिळनाडू अशा अनेक राज्यातील हळद याठिकाणी विक्रीसाठी शेतकरी घेऊन येतो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सर्व सौदे बंद पडले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. सुमारे २५ कोटीहून अधिक उलाढाल ठप्प झाली होती. तर हळद अजून काही दिवस अशीच राहिली तर हळदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरण्याची भीती बाजार समितीकडून शासनाकडे व्यक्त करण्यात आली होती.

यावर केंद्र आणि राज्य सरकारकडून शेती माला खरेदी-विक्रीसाठी गर्दी टाळता परवानगी दिली आहे. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने हळद सौदे आज पासून सुरू केले आहेत. ऑनलाईन पद्धतीने हे सौदे सुरू झाले आहेत. आजच्या या 'ई नाम' पद्धतीने सौदे करण्यासाठी 27 व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता. हळदीचे व्हिडिओ आणि फोटो ऑनलाइन पाहून त्याची खात्री करुन हे व्यवहार पूर्ण करण्याची ही प्रक्रिया आहे. आजच्या या 'ई टेंडरगी' लिलावाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये बाजार समितीच्या माध्यमातून पूर्ण पारदर्शकता ठेवण्यात आली आहे.

अशी असेल 'ई नाम' लिलाव पध्दत...

सायंकाळपर्यंत सर्वांची दिल्लीतील कार्यालयात नोंदणी होऊन 'लॉगिन आयडी' आणि पासवर्ड मिळाले. ई-नाम पद्धतीने लिलावात अडत्यांकडून सौद्यातील हळदीची माहिती घेऊन ती ऑनलाईन केली जाईल. प्रत्येक हळद मालासाठी बार कोड दिला जाईल. सौदे करण्यासाठी सुमारे तीन तास देण्यात येतील. व्यापाऱ्यांनी अडत्यांकडून दिलेल्या माहितीनुसार संबंधित दुकानात जाऊन हळद पाहणी करायची आहे. त्यानंतर आपल्या दुकानात येऊन त्या कोड नंबरनुसार दराची ऑनलाईन नोंदणी करायची आहे. संध्याकाळी बाजार समितीकडून संबंधित मालाच्या कोड नंबरनुसार तपासणी केली जाईल. जास्तीत जास्त बोली जाहीर केली जाईल. त्यानंतर संबंधित शेतकरी व अडत्या व्यापाऱ्यांकडून हळद विक्रीबाबत संमती घेतील. तेव्हाच तो व्यवहार पूर्ण समजला जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.