ETV Bharat / state

भाजप महिला प्रदेशाध्यक्षा नीता केळकर सांगली मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात !

भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा नीता केळकर यांनी विधानसभेच्या उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारीवरून बंडाळी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सांगली विधानसभा
author img

By

Published : Sep 14, 2019, 3:01 PM IST

सांगली - शहरात भाजपच्या उमेदवारीवरून बंडाळी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा नीता केळकर यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे विद्यमान भाजप आमदारांच्या विरोधात नीता केळकर या मैदानात उतरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

निता केळकर सांगली विधानसभा मैदानात उतरणार

सांगलीतील भाजपचे जेष्ठ नेते नीता केळकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. नीता केळकरांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून सांगली विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागात भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यामुळे त्यांची विधानसभा लढण्याची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट आहे. तीस वर्षांपासून नीता केळकर या भाजपमध्ये एकनिष्ठपणे कार्यरत आहेत. त्यांनी भाजपसाठी उत्कृष्ठ कामगिरी बजावली. तरी सुद्धा भाजप सत्तेत आल्यानंतर त्यांच्या पदरी फारसे काही पडले नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाने संधी द्यावी, अशी मागणी केळकर यांच्या कार्यकर्त्यांमधून करण्यात येत आहे. दुसऱ्या बाजूला खुद्द नीता केळकर यांनीही विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी जोरदारपणे सुरू केली आहे. तसेच पक्षपातळीवर आपण उमेदवार मागणार असून कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, अशी भूमिका निता केळकर यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केली आहे. त्यामुळे सांगलीतल्या भाजप उमेदवारीवरून आता बंडाळी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्यमान भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासमोर नीता केळकर यांच्या उमेदवारी मागणीमुळे अडचणी निर्माण होणार आहेत.

Intro:File name - mh_sng_01_bjp_sangli_umedwari_vis_01_7203751 - mh_sng_01_bjp_sangli_umedwari_byt_03_7203751

स्लग - भाजपा नेत्या निता केळकर सांगली विधानसभा मैदानात उतरणार !

अँकर - सांगलीमध्ये भाजपाच्या उमेदवारीवरून बंडाळी होण्याची शक्यता सध्या निर्माण झाली आहे,भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा नीता केळकर यांनी उमेदवाराची मागणी केली आहे.त्यामुळे विद्यमान भाजपा आमदार यांच्या विरोधात नीता केळकर या मैदानात उतरणार असल्याचे चित्र निर्माण झालं आहे.Body:सांगलीतल्या भाजपमधील जेष्ठ नेते असणाऱ्या नीता केळकर यांनी विधानसभा निवडणूक मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सांगली जिल्ह्यात येणाऱ्या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून सांगली विधानसभा मतदार संघातल्या ग्रामीण भागात त्यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत.आणि या माध्यमातून विधानसभा लढण्याची तयारी सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. गिरड तीस वर्षांपासून नीता खेळकर या भाजपामध्ये एकनिष्ठ म्हणून कार्यरत आहेत राज्यपातळीवर भाजपासाठी कृष्ट कामगिरी बजावून सुद्धा सत्तेत आल्यानंतर नीता केळकर यांच्या पदरी भाजपाकडून फारसं काही पडले नाही, त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाने संधी द्यावी अशी मागणीही केळकर यांच्या कार्यकर्त्यांच्या मधून करण्यात येत आहे.दुसऱ्या बाजूला खुद्द नीता केळकर यांनीही विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी जोरदारपणे सुरू केली आहे,तसेच पक्षपातळीवर आपण उमेदवार मागणार असून कोणत्याही परिस्थितीत माघार नाही,अशी भूमिका निता केळकर यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केली आहे. त्यामुळेच सांगलीतल्या भाजपा उमेदवारीवरून आता बंडाळी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, विद्यमान भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासमोर नीता केळकर यांच्या उमेदवारी मागणीमुळे अडचणी होणार आहेत.

बाईट - निता केळकर - नेत्या, भाजपा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.