सांगली - अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादी बॅकफूटवर नाही. अनिल देशमुख यांनी स्वतः हा शरद पवार यांच्याकडे जाऊन चौकशी होणार असेल तर मी राजीनामा देतो असे म्हणून राजीनामा दिला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. तसेच चौकशी होणार असेल तर स्वत हून त्यांनी राजीनामा दिला आहे, त्यांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - अनिल देशमुख यांना आता नैतिकता सुचली का? - देवेंद्र फडणवीस
गृहमंत्री पद हे मुख्यमंत्री ठरवतील - जयंत पाटील
गृहमंत्री पदासाठीच्या संभाव्य व्यक्तीबद्दल भाष्य करू नये, गृहमंत्री पद हे मुख्यमंत्री ठरवतील. तसेच सीबीआयने चौकशी केल्यावर सत्य बाहेर येईल, अशी प्रतिक्रिय जयंत पाटील यांनी दिली. कोरोनामुळे विधानसभा अध्यक्ष पद भरले नाही, लवकरच ते भरले जाईल, असेही पाटील यांनी सांगितले. सचिन वाझे हा अलीकडेचे पुन्हा पोलीस सेवेत दाखल झाला होता. आताच्या सेवेतील त्याचा सहवास हा तत्कालीन माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासोबत राहिला असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - सीबीआय चौकशी होईपर्यंत राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपला राजीनामा द्यावा - देवेंद्र फडणवीस