ETV Bharat / state

जुन्या वादातून मणेराजुरीत महाविद्यालयीन तरुणाचा खून, तिघा अल्पवयीन मुलांकडून हल्ला - अल्पवयीन मुलांकडून तरुणाचा खून

जुन्या वादातून मणेराजुरीत महाविद्यालयीन तरुणाचा खून झाला. हा खून अल्पवयीन मुलांकडून झाला आहे.

Murder of a college youth in Manerajuri over an old dispute
जुन्या वादातून मणेराजुरीत महाविद्यालयीन तरुणाचा खून, तिघा अल्पवयीन मुलांकडून हल्ला
author img

By

Published : Jan 30, 2021, 3:50 PM IST

सांगली - जुन्या वादातून तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा चाकूने भोकसकुन खून झाल्याची घटना घडली आहे. अक्षय बाबासो चव्हाण (वय- 17) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या खून प्रकरणी तिघा अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करत तासगाव पोलिसांना त्यांना ताब्यात घेतले आहे.

Murder of a college youth in Manerajuri over an old dispute
जुन्या वादातून मणेराजुरीत महाविद्यालयीन तरुणाचा खून, तिघा अल्पवयीन मुलांकडून हल्ला

महाविद्यालयीन तरुणाचा खून -

तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील मणेराजुरी हायस्कूलच्या ज्युनियर कॉलेज याठिकाणी अक्षय चव्हाण हा शिकत होता, त्याच्यामध्ये आणि त्याच्या कॉलेजमधील विध्यार्थ्या सोबत 1 एक महिन्यापासून धुसफुस सुरू होती. स्थानिक पातळीवर तो वाद मिटविण्याचा प्रयत्नही झाला होता. दरम्यान शुक्रवारी कॉलेज सुटल्यावर अक्षय याला फोन करून रस्त्यावर बोलवण्यात आले, आणि काही कळायच्या आत अक्षय याच्या पोटात चाकू भोकसले. अचानक झालेल्या हल्ल्याने तो भांबावला व रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. आरडाओरडा होताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेऊन अक्षयला गावातील डॉक्टर व नंतर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना मध्यरात्रीच्या सुमारास अक्षय चव्हाण याचा मृत्यू झाला आहे.

तिघा अल्पवयीन मुलांचा समावेश -

या हल्ल्या प्रकरणी मृत अक्षय चव्हाण याचे नातेवाईक अविनाश चव्हाण यानी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यानुसार तिघांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास तासगाव पोलीस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.