ETV Bharat / state

सांगलीत पालिका कार्यालयावर फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांचा धडक मोर्चा - sangali latest update

शिवसेना आणि जनसेवा फळे, भाजीपाला व खाद्यपेय विक्रेते संघटनेच्यावतीने सोमवारी सांगली महापालिका प्रशासनाच्या विरोधात महापालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

सांगलीत पालिका कार्यालयावर मोर्चा
सांगलीत पालिका कार्यालयावर मोर्चा
author img

By

Published : Dec 21, 2020, 5:01 PM IST

सांगली - फेरीवाले, भाजीपाला विक्रेते यांना विनाशुल्क परवाने द्यावे, उपयोगकर्ता कर रद्द करावा, यासह विविध मागण्यांसाठी सांगली महापालिका मोर्चा काढण्यात आला आहे. "देता की जात", असा इशारा देत शिवसेना आणि जनसेवा भाजीपाला संघटनेच्या नेतृत्वाखाली हा धडक मोर्चा काढण्यात आला.

शंभूराज काटकर -शहर प्रमुख ,शिवसना

जाचक उपयोगकर्ता कर रद्द करा-

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेच्या वतीने राष्ट्रीय फेरीवाला धोरण अंतर्गत फेरीवाले विक्रेत्यांना ओळखपत्र व परवाने देण्यात येत आहेत. मात्र परवाने आणि ओळखपत्र प्रक्रियेसाठी पालिका प्रशासनाकडून अवाजवी शुल्क आकारण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना आणि जनसेवा फळे, भाजीपाला व खाद्यपेय विक्रेते संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे.

तसेच पालिका प्रशासनाकडून फेरीवाले व भाजीपाला विक्रेत्यांना उपयोगकर्ता कर लागू करण्यात आला आहे. याविरोधात सोमवारी शिवसेना आणि जनसेवा फळे, भाजीपाला व खाद्यपेय विक्रेते संघटनेच्यावतीने सोमवारी सांगली महापालिका प्रशासनाच्या विरोधात महापालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

परवाने द्या,अन्यथा तीव्र आंदोलन-

स्टेशन चौक येथून शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा निघाला. यावेळी महापालिका क्षेत्रातील हजारो विक्रेते मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
शिवसेना शहर प्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. पालिका प्रशासनाने तातडीने विनाशुल्क परवाने द्यावे, उपयोगकर्ता कर रद्द करावा, अश्या मागण्या करत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा- पुणे : सारसबागेसमोर डंपरखाली चिरडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

हेही वाचा- पिंपरी-चिंचवडमध्ये संगणक अन् झेरॉक्स दुकानाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.