ETV Bharat / state

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात मनसेसह शिवसेनेचा शिंदे गट आक्रमक, तोंडाला काळे फासण्याचा इशारा

author img

By

Published : Nov 18, 2022, 8:53 AM IST

Updated : Nov 18, 2022, 9:15 AM IST

मनसेच्या वतीने राहुल गांधींची भारत जोडो यात्रेतील सभा उधळण्याचा इशारा देण्यात आलेला (MNS to disrupt Rahul Gandhi meeting) आहे. तर मिरजेत राहुल गांधींच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करत राहुल गांधींच्या तोंडाला भारत जोडो यात्रेत घुसून काळे फासण्याचा इशारा शिंदे गटाच्या शिवसेनेकडून देण्यात आला (Shinde group Shiv Sena Jode Maro Protest) आहे.

Rahul Gandhi
राहुल गांधीची सभा उधळून लावण्याचा मनसेचा तर ; तोंडाला काळे फसण्याचा शिंदे गट शिवसेनेचा इशारा

सांगली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांच्या बदल केलेल्या विधानाचे पडसाद सांगली-मिरजेत देखील उमटले आहेत. मनसेच्या वतीने राहुल गांधींची भारत जोडो यात्रेतील सभा उधळण्याचा इशारा देण्यात आलेला (MNS to disrupt Rahul Gandhi meeting) आहे. तर मिरजेत राहुल गांधींच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करत राहुल गांधींच्या तोंडाला भारत जोडो यात्रेत घुसून काळे फासण्याचा इशारा शिंदे गटाच्या शिवसेनेकडून देण्यात आला (Shinde group Shiv Sena Jode Maro Protest) आहे.

राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध : सांगलीच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात येऊन राहुल गांधींच्याकडून सावरकरांचा अपमान हा कदापी सहन केला जाणार नाही. आणि राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाबाबत तातडीने जाहीर माफी मागावी. अन्यथा उद्या त्यांची भारत जोडो यात्रेनिमित्त बुलढाणा येथील शेगाव या ठिकाणी होणारी सभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उधळून लावेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया देताना मनसे व शिंदे गट शिवसेना नेते

संतप्त प्रतिसाद : दरम्यान मिरजेत देखील काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाचे संतप्त प्रतिसाद उमटले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेकडून राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन करण्यात आले (Shinde group Shiv Sena Protest in Sangali) आहे. शहरातील महाराणा प्रताप चौक येथे राहुल गांधी यांच्या डिजीटल फलकाला जोडे मारुन निषेध व्यक्त केला. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून हिंदूच्या भावना दुखावल्या आहेत. जर परत अशा घटना घडल्या, तर भारत जोडो यात्रेत घुसून राहुल गांधी यांच्या तोंडाला काळे फासले जाईल. असा इशारा बाळासाहेबांची शिवसेनेकडून देण्यात आला (Shinde group Protest against Rahul Gandhi) आहे.

Last Updated : Nov 18, 2022, 9:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.