ETV Bharat / state

'आदित्य ठाकरेंना लगेच मंत्री पद मिळतं, मग एमपीएससी उत्तीर्ण झालेल्यांना नियुक्त्या का नाही' - मंत्री उद्धव ठाकरे बातमी

या सरकारला मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण द्यायचे नाही, असा आरोपही आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

आमदार गोपीचंद पडळकर
आमदार गोपीचंद पडळकर
author img

By

Published : May 9, 2021, 3:03 PM IST

Updated : May 9, 2021, 5:05 PM IST

सांगली - आदित्य ठाकरे यांना लगेच कॅबिनेट मंत्री पद मिळते, मग एमपीएससीमधील विद्यार्थ्यांची नियुक्ती का होत नाही, असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. तर या सरकारला कोणत्याही समाजाला आरक्षण द्यायचे नाही, असा आरोप आमदार पडळकर यांनी केला आहे. ते सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

बोलताना पडळकर

'हे सरकार आरक्षण देऊ शकत नाही'

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका होत आहे. भाजपा आमदार व प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांनीही मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. आमदार पडळकर म्हणाले, मराठा आणि धनगर समाजाला या सरकारला आरक्षण द्यायचे नाही. राज्यातील 413 एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आद्यप नियुक्ती दिली नाही. ठाकरे सरकारने या विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे.

'या सरकारला धनगर अन् मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही'

या सरकारला मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण द्यायचे नाही, असा आरोपही आमदार पडळकर यांनी केला आहे.

'अन्यथा आंदोलन करू'

आदित्य ठाकरेंना लगेच कॅबिनेट स्थान देता येते, जसं आदित्यबाबत तत्परता दाखवली तीच तत्परता उद्धव ठाकरे यांनी या विद्यार्थ्यांच्या बाबतीत कधी दाखवणार. सरकारने यावर लवकरच निर्णय घेतला नाही तर आंदोलन करू, असा इशारा आमदार पडळकर यांनी दिला आहे.

'विश्वासघाती सरकारला पंढरपूरकरांनी उत्तर'

पंढरपूरमधील भाजपच्या विजयावरून बोलताना पडळकर म्हणाले, विश्वासघाताने सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारला पंढरपूरकरांनी चोख उत्तर दिले आहे. विश्वासघाताने सत्तेत आलेल्या सरकारला पंढरपूरमध्ये लोकांचा विश्वास जिंकता आला नाही, असा आरोपही आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

हेही वाचा - ..आणि मुलींचे होस्टेल बनले कोविड हॉस्पिटल, राजमती ट्रस्ट आणि जैन समाजाचा पुढाकार

Last Updated : May 9, 2021, 5:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.