ETV Bharat / state

"ढोल बजाओ, सरकार जगाओ", धनगर आरक्षणासाठी गोपीचंद पडळकरांची आंदोलनाची घोषणा

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीमधून राज्य सरकारविरोधात धनगर आरक्षणासाठी 'ढोल बजाओ, सरकार जगाओ' आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या २५ सप्टेंबर रोजी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

आमदार गोपीचंद पडळकर
author img

By

Published : Sep 22, 2020, 6:52 PM IST

सांगली - धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. 25 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी 'ढोल बजाओ, सरकार जगाओ' आंदोलनाची घोषणा त्यांनी केली आहे. कुंभकर्णाप्रमाणे झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आता धनगर समाज रस्त्यावर उतरत असल्याचे पडळकर यांनी सांगितले. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आमदार गोपीचंद पडळकर
धनगर आरक्षणाच्या मागणीवरून आता धनगर समाज आक्रमक झालेला आहे. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीमधून राज्य सरकारविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. गेल्या दहा महिन्यांपासून सरकार सत्तेमध्ये आलेले आहे. मात्र धनगर आरक्षणाच्या बाबतीत एक पाऊलही सरकारने उचललेलं नाही, तर भाजपा सरकारने सत्तेत असताना धनगर समाजासाठी एक हजार कोटींची तरतूद केली होती. मात्र त्यामधील एक रुपयासुद्धा या सरकारने दिला नाही. याशिवाय धनगर आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक भूमिकाही सद्याच्या सरकारकडून घेण्यात आलेली नाही, असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. त्याबरोबर धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांनाही आपण पत्र पाठवून तातडीने आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घ्यावा,जे आदिवासी समाजाला सवलत तीच धनगर समाजाला द्यावी, तातडीने धनगर समाजाच्या तरुणांना एसटीचे दाखले द्यावेत,अशी मागणी केली होती. मात्र सरकारकडून धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत दुजाभाव होत आहे. त्यामुळे आता समाजाच्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असून येत्या 25 सप्टेंबर रोजी कुंभकर्णाप्रमाणे झोपी गेलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी राज्यभर "ढोल बजाव, सरकार जगाव" हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले आहे.

राज्यभरात धनगर समाज वेगवेगळ्या पातळ्यांवर हे आंदोलन करेल आणि समाजानेही या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला जागे करावे, असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. तसेच आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा सुरुवात झाली असून 25 सप्टेंबर रोजी आपण पंढरपूर या ठिकाणी विठ्ठल मंदिरासमोर स्वतः ढोल वाजवत सरकारविरोधात हे आंदोलन करणार असल्याचे, आमदार पडळकर यांनी स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.