ETV Bharat / state

१ ऑगस्टला राज्यव्यापी दूधबंद आंदोलन, सदाभाऊ खोतांची घोषणा - सांगली लेटेस्ट न्यूज

दुधाच्या प्रॉडक्ट्ची विक्री १० ते १५ टक्क्यांपर्यंत खाली आलेली आहे. त्यामुळे दुधाचे दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना पैसे वेळेत मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने दूध उत्पादन शेतकऱ्यांना प्रतिलिटर १० रुपये अनुदान द्यावे अथवा गाईचे दूध प्रतिलिटर ३० रुपये दराने खरेदी करावे, यासह विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम पक्ष व भारतीय जनता किसान मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी दूध बंद आंदोलन करण्यात येणार घोषणा करण्यात आली आहे.

milk ban agitation news  milk ban agitation 1st of august  राज्यव्यापी दूधबंद आंदोलन  सदाभाऊ खोत न्यूज  सांगली लेटेस्ट न्यूज  १ ऑगस्ट दूधबंद आंदोलन
१ ऑगस्टला राज्यव्यापी दूधबंद आंदोलन, सदाभाऊ खोतांची घोषणा
author img

By

Published : Jul 17, 2020, 2:58 PM IST

सांगली - दूध दर मागणीसाठी एक ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दूध बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. रयत क्रांती संघटनेसह विविध पक्ष व संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. ते आज सांगलीमध्ये बोलत होते.

१ ऑगस्टला राज्यव्यापी दूधबंद आंदोलन, सदाभाऊ खोतांची घोषणा

कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील दूध व्यवसाय अडचणीत सापडला आहे. दुधाच्या प्रॉडक्ट्ची विक्री १० ते १५ टक्क्यांपर्यंत खाली आलेली आहे. त्यामुळे दुधाचे दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना पैसे वेळेत मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने दूध उत्पादन शेतकऱ्यांना प्रतिलिटर १० रुपये अनुदान द्यावे अथवा गाईचे दूध प्रतिलिटर ३० रुपये दराने खरेदी करावे, यासह विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम पक्ष व भारतीय जनता किसान मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी दूध बंद आंदोलन करण्यात येणार घोषणा करण्यात आली आहे. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनाची घोषणा केली असून एक ऑगस्टला राज्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध न घालता सरकारचा निषेध करावा, असे आवाहन खोत यांनी केले आहे. तसेच या मागणीसाठी १ ऑगस्ट २०२० ला सकाळी ११ वाजता निदर्शनेही करण्यात आल्याचे खोत यांनी सांगितले आहे. या आंदोलनात दूध उत्पादन शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले आहे.

महाराष्ट्रात दररोज १ कोटी ४० लाखाच्या आसपास दुधाचे उत्पादन होत आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्यातील सर्व हॉटेल, स्विटहोम, चहा टपरी, अशाप्रकारे दूध व दुधाच्या पदार्थांची विक्री करणारी साधने बंद झालेली आहेत. परिणामी २० मार्च २०२० पासून पिशवी पॅकिंग दुधाचा खप ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत खाली आलेला आहे. या सर्व संकटात सरकारकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जात आहे. त्यामुळे या आंदोलनाची घोषणा करण्यात आली असल्याची माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. तसेच यावेळी बोलताना खोत यांनी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर सरकारने प्रशासक नियुक्तीचा घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे. सरकारने राजकीय फायद्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप करत गावातील योग्य व्यक्तीची निवड करताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीम यांनी कोणते थर्मामीटर लावले आहे, असा टोला खोत यांनी लागवला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.