सांगली - सांगली जवळील कसबे डिग्रज आणि कडमवाडी परिसरात बिबट्या दिसल्याची चर्चा पसरली आहे. आसपासच्या परिसरातल्या शेतालगत बिबट्या दिसल्याचे काही ग्रामस्थांचे मत आहे, तर या ठिकाणी ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे हा बिबट्या असल्याची चर्चा सगळीकडे सुरू असून वन विभागाने यानंतर घटनास्थळी तातडीने धाव घेतली असून परिसरात खरच बिबट्याच आला आहे का? याचा शोध सुरू केला आहे.
पुन्हा बिबट्या आल्याची चर्चा..!
सांगली शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या कसबे डिग्रज आणि कदमवाडी या परिसरामध्ये बिबट्या आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सकाळी काही ग्रामस्थांना गावातील शेतात बिबट्या दिसल्याची चर्चा सुरू झाली आणि काही वेळात ही बातमी परिसरात पसरली. त्यामुळे कसबे डिग्रज परिसरामध्ये त्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी ग्रामस्थांनी सकाळपासून सुरुवात केली होती. तर गावालगतच्या शेताजवळ काही ठसे आढळून आले. याची माहिती मिळताच वनविभाग व प्राणी मित्रांनी कदमवाडी कसबे डिग्रज परिसरात धाव घेत, ठशांची पाहणी करत परिसरामध्ये बिबट्याच आला आहे का? याचा शोध सुरू केला आहे. त्यामुळे बिबट्या आल्याची जोरदार चर्चा सांगली शहरासह परिसरात रंगली आहे. काही महिन्यांपूर्वीच सांगली शहरांमध्ये बिबट्या आल्याची घटना घडली होती. अन्यथा कदमवाडी कसबे डिग्रजमध्ये बिबट्या दिसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा - मुंबईत रात्रभर पाऊस, पुन्हा होऊ शकते मुंबईची तुंबई