ETV Bharat / state

सांगली : अखेर 12 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद - सांगली शहर बातमी

सांगली शहरात शिरलेल्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात यश आले आहे. वन विभाग, प्राणी मित्र आणि पालिका व पोलीस प्रशासनाच्या मदतीने बारा तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात आले आहे.

बिबट्या
बिबट्या
author img

By

Published : Apr 1, 2021, 7:34 AM IST

Updated : Apr 1, 2021, 9:46 AM IST

सांगली - शहरात शिरलेल्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात यश आले आहे. वन विभाग, प्राणी मित्र आणि पालिका व पोलीस प्रशासनाच्या मदतीने बारा तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात आले आहे.

बोलताना वन अधिकारी

बारा तासांच्या रेस्क्यू नंतर बिबट्या जेरबंद

सांगली शहरामध्ये बुधवारी (दि. 31 मार्च) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बिबट्या शिरल्याची घटना समोर आली. राजवाडा चौक या ठिकाणी या बिबट्याने एका कुत्र्याला ठार मारत पटेल चौकाकडे जाणाऱ्या एका पडक्या इमारतीमध्ये घुसून अडगळीच्या ठिकाणी लपून बसला होता. सुरुवातीला हा बिबट्या आहे का नाही ? याबाबतही शंका होती. मात्र, वनविभागाकडून हा बिबट्या असल्याची खात्री झाल्यानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी बचावकार्य (रेस्क्यू ऑपरेशन) सुरू करण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून राजवाड्याचे परिसरामध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले.

तसेच या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कोल्हापूर येथून विशेष पथक बोलावण्यात आले. त्याचबरोबर प्राणिमित्र आणि इतर रेस्क्यू टीमच्या माध्यमातून सकाळी दहा वाजल्यापासून बिबट्याला जेरबंद करण्याची मोहीम सुरू झाली. तब्बल 12 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात यश आले आहे. वन विभागाकडून या बिबट्याला बंदुकीद्वारे बेशुद्धचे इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर बिबट्या बेशुद्ध होताच वन विभागाने या बिबट्याला पिंजऱ्यात कैद करत ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ विभागाच्या आदेशानंतर या बिबट्याला कुठे सोडायचा ? याबाबतचा निर्णय होणार असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितला आहे.

हेही वाचा - बेदरकारपणे ट्रक चालवणाऱ्या मद्यधुंद ट्रक चालकाने तरुणाला चिरडले

Last Updated : Apr 1, 2021, 9:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.