ETV Bharat / state

'कडकनाथ' घोटाळा प्रकरण : सांगलीत स्वाभिमानी व प्रहार संघटनेचा आसूड मोर्चा

author img

By

Published : Aug 30, 2019, 5:02 PM IST

Updated : Aug 30, 2019, 5:12 PM IST

कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायामध्ये जिल्ह्यातील इस्लामपूर येथील महारयत अॅग्रो कंपनीकडून राज्यात सुमारे पाचशे कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आला आहे. सुमारे 8 हजार शेतकरी, सर्वसामान्य आणि बेरोजगार तरुणांनी कंपनीच्या कोंबडी पालन व्यवसायात दुप्पट-तिप्पट नफ्याच्या आमिषाला बळी पडले. म्हणून कंपनीच्या संचालकांवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी इस्लामपूरमध्ये आसूड मोर्चा काढण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर पोलीस ठाण्यावर हा मोर्चा निघाला.

मोर्चात सहभागी संघटनेचे कार्यकर्ते

सांगली - कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय प्रकरणी महारयत अॅग्रो कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. म्हणून कंपनीच्या संचालकांवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी इस्लामपूरमध्ये आसूड मोर्चा काढण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर पोलीस ठाण्यावर हा मोर्चा निघाला. तर येत्या 13 तारखेपर्यंत कारवाई न झाल्यास कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या दारात आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

आंदोलनात प्रहार संघटनेचे शभूराज खराटे सरकारला इशारा देताना

कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायामध्ये जिल्ह्यातील इस्लामपूर येथील महारयत अॅग्रो कंपनीकडून राज्यात सुमारे पाचशे कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आला आहे. सुमारे 8 हजार शेतकरी, सर्वसामान्य आणि बेरोजगार तरुणांनी कंपनीच्या कोंबडी पालन व्यवसायात दुप्पट-तिप्पट नफ्याच्या आमिषाला बळी पडले. यासाठी प्रत्येकी 75 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून कंपनीकडून कोंबडी आणि अंड्यांची खरेदी होत नसल्याने हा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यात महारयतच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

तर यावेळी महारयत अॅग्रोच्या संचालकांवर अटकेची कारवाई करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. तर या घोटाळा प्रकरणी राज्य सरकारकडून 12 सप्टेंबर पर्यंत कारवाई न झाल्यास 13 सप्टेंबर रोजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या इस्लामपूर येथील निवासस्थाना समोर आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा यावेळी स्वाभिमानी आणि प्रहार संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.

Intro:File name - mh_sng_02_asud_morcha_vis_1_7203751 - mh_sng_02_asud_morcha_byt_4_7203751

स्लग :- कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी व प्रहार संघटनेचा आसूड मोर्चा...

अँकर - कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय प्रकरणी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या महारयत ॲग्रो कंपनीच्या संचालकांवर कडक कारवाईच्या मागणीसाठी इस्लामपूर मध्ये आसूड मोर्चा काढण्यात आला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर पोलीस ठाण्यावर हा मोर्चा निघाला.तर येत्या 13 तारखेपर्यंत कारवाई न झाल्यास कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या दारात आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.Body:कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायामध्ये सांगलीतल्या इस्लामपूर येथील महारयत ऍग्रो कंपनी कडून राज्यात सुमारे पाचशे कोटींच्या घोटाळा झाल्याचं समोर आला आहे.सुमारे 8 हजार शेतकरी ,सर्वसामान्य आणि बेरोजगार तरुणांनी कंपनीच्या कोंबडी पालन व्यवसायात दुप्पट-तिप्पट नफ्याच्या आमिषाला बळी पडून प्रत्येकी 75 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती.मात्र गेल्या काही महिन्यापासून या कंपनीकडून कोंबडी आणि अंड्यांची खरेदी होत नसल्याने हा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यात महारयतच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.तर या घोटाळ्याच्या निषेधार्थ व शेतकरी ,बेरोजगार,सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या महारयत ऍग्रोच्या संचालकांवर कडाई कडक कारवाई करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रहार संघटनेच्या वतीने आज इस्लामपूर मध्ये आंदोलन करण्यात आले आहे.इस्लामपूर पोलीस ठाण्यावर शेकडो कार्यकर्त्यांनी आसूड मोर्चा काढत,तातडीने महारयत ऍग्रोच्या संचालकांवर अटकेची कारवाई करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.तर या घोटाळा प्रकरणी राज्य सरकारकडून 12 सप्टेंबरकारवाई न झाल्यास 13 सप्टेंबर रोजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या इस्लामपूर येथील निवासस्थाना समोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी स्वाभिमानी आणि प्रहार संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.

बाईट - शंभूराज खराटे - प्रहार संघटना,सांगली.Conclusion:
Last Updated : Aug 30, 2019, 5:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.