सांगली - काँग्रेस, राष्ट्रवादीसह मित्र पक्षांच्या महाआघाडीला राज्यात २८ ते ३० जागा मिळतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील साखराळे येथे बुथ क्रमांक ६३ वर त्यांनी आपल्या कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बाजवला, त्यावेळी ते बोलत होते.
जयंत पाटील यांनी सामान्य जनतेप्रमाणे साखराळे येथील मतदान केंद्रावर रांगेत उभारून आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी बोलताना त्यांनी राज्यात महाआघाडीच्या २८ ते ३० जागा निवडूण येतील असा विश्वास व्यक्त केला.