ETV Bharat / state

पाडव्याच्या मुहूर्तावर गुळ आणि हळद सौद्यांचा शुभारंभ, गुळाला मिळाला उच्चांकी दर - सांगली हळद दर

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पाडव्याच्या मुहूर्तावर आज सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये नवीन हंगामाच्या हळद आणि गुळाच्या सौद्याचा शुभारंभ झाला आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती दिनकर पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी व्यापारी आणि शेतकऱ्यांनी उत्साहाच्या वातावरणात सहभाग घेतला.

गुळ आणि हळद सौद्यांचा शुभारंभ
गुळ आणि हळद सौद्यांचा शुभारंभ
author img

By

Published : Nov 5, 2021, 7:43 PM IST

सांगली - सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाडव्याच्या मुहूर्तावर गुळ आणि हळद सौद्यांचा शुभारंभ करण्यात आला. दोन वर्षे कोरोनाच्या काळानंतर नवीन हंगामाच्या या सौद्यात गुळाला 3951 रुपये इतका उच्चांकी दर मिळाला आहे. तर हळदीला साडे आठ ते नऊ हजार इतका दर मिळाला आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पाडव्याच्या मुहूर्तावर आज सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये नवीन हंगामाच्या हळद आणि गुळाच्या सौद्याचा शुभारंभ झाला आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती दिनकर पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी व्यापारी आणि शेतकऱ्यांनी उत्साहाच्या वातावरणात सहभाग घेतला. दोन वर्षे कोरोनाच्या काळानंतर नवीन हंगामाच्या या सौद्यात गुळाला 3 हजार 951 रुपये इतका उच्चांकी दर मिळाला आहे.

पाडव्याच्या मुहूर्तावर गुळ आणि हळद सौद्यांचा शुभारंभ

हेही वाचा-आता एसटी कर्मचाऱ्यांची मंत्रालयावर धडक, मंत्रालयासमोर करणार आंदोलन - गोपीचंद पडळकर

कोरोनानंतरच्या सौद्यांना सुरुवात

हळद सौद्यासाठी बाजार समितीच्या आवारात दीड हजार पोत्यांची आवक झाली होती. कोरोनाच्या काळानंतर खुल्या पध्दतीने पार पडलेल्या या सौद्यात शेतकऱ्यांनी उत्साहाच्या वातावरण या सौद्यात सहभाग घेतला. तेलंगणा,आंध्र, मराठवाडा, कर्नाटक मधून हळदीची आवक असते. एक दिवस आड हे सौदे मार्केटमध्ये होतात. आज हळदीला साडे आठ ते नऊ हजार दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा-दिवाळीच्या पर्वावर भाविकांना मिळतो 'पैशांचा प्रसाद', अमरावतीच्या कालीमाता मंदिरातील प्रथा

हळदीची जागतिक बाजारपेठ असणाऱ्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन वर्षातील स्थानिक हळदीच्या सौद्यांनाही विक्रमी दर मिळाला होता. त्यावेळी तासगावच्या शेतकऱ्याच्या हळदीला प्रति क्विंटल 7 हजार 500 इतका दर मिळाला होता.

हेही वाचा-भाजपशासित राज्यांकडूनही इंधन दरकपात, जाणून घ्या कोणत्या राज्यात किती दर?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.