मिरज - भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी जागेचा ताबा घेण्यासाठी पाडलेल्या बांधकाम प्रकरणी आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. वहिवाट धारकांच्याकडून कागदपत्रे सादर करण्यासाठी आठ दिवसांची मुदत मागण्यात आली आहे. त्यामुळे तहसीलदारांनी मुदत देत 19 जानेवारी ही सुनावणीची अंतिम तारीख दिली आहे. त्यामुळे आता या जागेच्या बाबतीत 19 तारखेपर्यंत जैसे थे आदेश कायम आहेत. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मानंद पडळकर यांनी रातोरात 6 जानेवारी रोजी मिरज शहरातले आठ मिळकती जेसीबीने पाडल्या होत्या.
9 जानेवारी पुढील सुनावणी - त्यानंतर प्रचंड रोष या ठिकाणी पाहायला मिळाला होता. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. या सर्व प्रकरणावरून जागेच्या मालकीचा वाद उफाळून आला होता. पडळकर यांनी ही जागा आपली असल्याचा दावा केला होता. हे प्रकरण अंतिमता तहसीलदारांच्या समोर गेले. यामध्ये सोमवारी पहिल्यांदा सुनावली पार पडली होती. दोन दिवसांची मुदत या ठिकाणी देण्यात आली होती. आज बुधवारी पुन्हा या ठिकाणी सुनावणी पार पडली आहे मात्र, या ठिकाणी आता दोन्ही गटांकडून जागेच्या पुराव्याबाबत मुदत मागण्यात आली आहे. त्यामुळे आठ दिवसांची तहसीलदार दगडू कुंभार यांनी मुदत दिली आहे. 19 जानेवारी रोजी या जागेच्या बाबतीतचा अंतिम सुनावणी पार पडणार असल्याचे दोन्ही बाजूने स्पष्ट केले आहे.
पुराव्याबाबत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश - भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मानंद पडळकर यांनी मिरजेत जागेचा ताबा घेण्यासाठी पाडलेली घरे, दुकान, हॉटेल पाडल्या प्रकरणीआता मिरज तहसीलदारांकडून जैसे थे आज असे देण्यात आले आहे. दोन दिवसांच्या आत जागेच्या पुराव्याबाबत कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत वहिवाट धारकांना दिली आहे अशी, माहिती वकील अल्लाबक्ष काजी यांनी दिली आहे.
बेकायदेशीर जमीन खरेदी केली ब्रह्मानंद पडळकर यांनी बेकायदेशीर जमीन खरेदी केली आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना, पडळकर यांनी बेकायदेशीर कृत्य केल्याचा आरोप जमिनीच्या मूळ मालकाचे वारस, विष्णू लामदाडे यांनी केला आहे. जमिनीचे मुळ कूळ मालक लामदाडे आणि गुरमुखसिंग चड्डा यांच्यात या जमिनीच्या मालकी हक्काबाबत उच्च न्यायालयात प्रकरण सुरू आहे. 25 मार्चला पुढील तारीख आहे. मात्र त्या अगोदरच पडळकर यांनी बेकायदेशीर जमीन खरेदी करून ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लामदाडे यांनी केला आहे. अजून लामदाडे आणि चड्डा यांच्यात जमिनीच्या हक्काबाबत निकाल लागला नाही. चड्डा यांच्याकडून पडळकर यांनी बेकायदेशीरपणे जमीन खरेदी केल्याचा आरोप विष्णू लामदाडे यांनी केला आहे.
उच्च न्यायालयात केस सुरू कूळ मालकाचे वारस लामदाडे म्हणाले, 784 अ मधील 49 गुंठे आणि 784 ब 12 गुंठे या जागेच्या मालकी हक्काबाबत उच्च न्यायालयात केस सुरू आहे. 1987 पासून जागेच्या बाबतीत न्यायालयीन लढा देत आहोत. गुरमुखसिंग चड्डा यांच्या विरोधात न्यायालयात जागेच्या मालकीबाबत वाद सुरू असून, 9 डिसेंबर 2022 रोजी या जागेच्या वादाबाबत उच्च न्यायालयामध्ये सुनावणी देखील होती. मात्र ती आता 25 मार्चला होणार आहे. न्यायालयीन बाब असताना जागेची खरेदी व्यवहार कसा होऊ शकतो ? हा हायकोर्टाचा अवमान असून जागेची खरेदी आणि जागेचा ताबा घेणे हे कायदेशीर दृष्ट्या चुकीचा असून याबाबत आम्ही आता प्रांताधिकार्यांच्या समोर न्यायालयीन बाब समोर आणणार आहे. पण पडळकर यांनी खरेदी केलेली जमीन बेकायदेशीर खरेदी केलेली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी विष्णू लामदाडे यांनी केली आहे.
जागा नेमकी कोणाची ? मात्र यापूर्वी लामदाडे आणि चड्डा यांच्यामधील जमिनीच्या हक्काच्या दाव्या संदर्भात वेगवेगळे निकाल लागले आहेत. कधी लामदाडे तर कधी गुरमुखसिंग चड्डा यांच्या बाजूने निकाल यापूर्वी लागला आहे. गुरमुखसिंग चड्डा यांच्या बाजूने काही निकाल लागल्यानंतर सातबारावर नाव लागल्याने जमिनी विक्री केल्याचे देखील समोर आले आहे. मात्र अजुनही जागेबाबत उच्च न्यायालयात केस सुरू असून याबाबतची पुढील तारीख 25 मार्च 2023 आहे. त्यामुळे ही जागा नेमकी कोणाची ? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. याबाबत आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा - Gopichand Padalkar : पडळकर यांनी पाडलेल्या बांधकामाच्या जागेबाबत तहसिलदारांचे दोन दिवसासाठी जैसे थे आदेश