ETV Bharat / state

जत तालुक्यात आरोग्याबाबत असणारी कमतरता लवकरच भरून काढू - जयंत पाटील - जयंत पाटील यांच्या बद्दल बातमी

जत तालुक्यात आरोग्याबाबत असणारी कमतरता लवकरच भरून काढू, असे जयंत पाटील म्हणाले. येत्या चार ते पाच दिवसात त्याठिकाणी अत्यावश्यक सेवा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून रुग्णांना तात्काळ उपचार मिळावे, यासाठी प्रयत्न केला जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.

guardian-minister-jayant-patil-said-that-the-shortage-of-health-in-jat-taluka-will-be-filled-soon
जत तालुक्यात आरोग्या बाबत असणारी कमतरता लवकरच भरून काढू - जयंत पाटील
author img

By

Published : May 3, 2021, 10:40 PM IST

सांगली (जत) - आपण विचित्र रोगाचा सामना करत आहोत, त्यामुळे जास्तीत जास्त व्हेंटिलेटर उपलब्ध करून ऑक्सिजनचा तुटवडा असला तरी तो कसा पुरवठा करता येईल, याकडे लक्ष देऊ. जत तालुक्यातील आरोग्याबाबतची कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही पालमंत्री जयंत पाटील म्हणाले. माडग्याळ येथे कोविड सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या चार ते पाच दिवसात त्याठिकाणी अत्यावश्यक सेवा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून रुग्णांना तात्काळ उपचार मिळावे, यासाठी प्रयत्न केला जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.

जत तालुक्यात आरोग्या बाबत असणारी कमतरता लवकरच भरून काढू - जयंत पाटील

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतली आढावा बैठक -

जत पंचायत समितीच्या सभागृहात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत, नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, प्रांताधिकारी प्रशांत आवटे, पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, तहसिलदार सचिन पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बंडगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, उपनगराध्यक्ष आप्पासो पवार, उत्तमशेट चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे, आदीसह विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा - एका रात्रीत लशींचे उत्पादन वाढविणे शक्य नाही- आदर पुनावाला

१८ ते ४५ वयोगटातील लाभार्थ्यांना लवकरच उपलब्धतेनुसार लसीकरण -

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, आशा वर्कर्सच्या माध्यमातून घरोघरी जाऊन रूग्णांची तपासणी करण्यासाठी उपाययोजना राबवा. रूग्णांना लक्षणे जाणवल्यास तात्काळ त्यांच्यावर उपचार सुरू करा. रेमडेसिवीर जिल्ह्यात दीडशे ते दोनशे पर्यंत उपलब्ध होत होते. आता वरिष्ठ पातळीवर आवाज उठवून सहाशे पर्यंत प्राप्त होत आहेत. १८ ते ४५ वयोगटातील लसीकरणासाठी केंद्राने हातवर केले असून राज्यावर याची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे कंपनीसोबत मुख्यमंत्री संपर्क करत आहेत. लवकरच नोंदणी करणार्‍यांना उपलब्धतेनुसार लसीकरण केले जाईल.

आरोग्य यंत्रणेबाबत तक्रारीचा महापूर -

माजी सभापती सुरेश शिंदे यांनी तालुक्यात आरोग्य कर्मचारी नाही, कोणतीही सुविधा रूग्णांना उपलब्ध होत नाही, असा मुद्दा मांडला. जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी रूग्ण कर्नाटकात जाऊन तपासणी करत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कमतरतेकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. सामाजिक कार्यकर्ते ढोणे यांनी गुड्डापूर येथे सुसज्ज कोविड सेंटर उभारण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावे, अशी मागणी केली.

हेही वाचा - 'सुरक्षेच्या आडून पूनावालांची हेरगिरी केली जातेय'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.