ETV Bharat / state

सांगली : ढगाळ वातावरणामुळे ४० हजार एकर क्षेत्रातील द्राक्षबागा पुन्हा संकटात..! - सांगली जिल्हा बातमी

आधी महापूर, नंतर अतिवृष्टी यामुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्षबाग शेती पुरती उध्वस्त झाली आहे, अशा परिस्थितीतून कशातरी वाचलेल्या द्राक्षबागा अनेक शेतकऱ्यांनी जीवापाड मेहनत करून आणि कर्ज काढून जगवल्या आहेत. मात्र, आता हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावण्याची शक्यता आहे.

Grape gardens
द्राक्षबागा
author img

By

Published : Dec 3, 2019, 4:35 PM IST

सांगली - जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा पुन्हा एकदा संकटात सापडल्या आहेत. सुमारे 40 हजार एकर द्राक्षबाग क्षेत्र धोक्यात आले आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांमध्ये चिंता वाढली आहे.

ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागा पुन्हा संकटात

हेही वाचा - कृष्णा नदी प्रदूषणाच्या विळख्यात; पालिकेचे दुर्लक्ष

आधी महापूर, नंतर अतिवृष्टी यामुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्षबाग शेती पुरती उध्वस्त झाली आहे, अशा परिस्थितीतून कशातरी वाचलेल्या द्राक्षबागा अनेक शेतकऱ्यांनी जीवापाड मेहनत करून आणि कर्ज काढून जगवल्या आहेत. मात्र, आता हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे या बागांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा - जागतिक एड्स दिनानिमित्त सांगलीत एच.आय.व्ही जनजागृती प्रभात फेरी

तर आणखी 2 दिवस असेच ढगाळ वातावरण राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना समोर या बागा कशा वाचवायच्या हा प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने लवकरात-लवकर द्राक्ष बाग शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Intro:File name - mh_sng_01_avkali_paus_drakshbag_ready_to_air_7203751 -

स्लग - अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागा पुन्हा संकटात...

अँकर - सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा संकटात सापडला आहेत.सुमारे 40 हजार एकर द्राक्षबाग क्षेत्र धोक्यात आले आहे. हाता-तोंडाशी आलेल्या या बागा वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.Body:आधी महापूर,नंतर अतिवृष्टी यामुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्षबाग शेती पुरती उध्वस्त झाली आहे.अश्या परिस्थितीतुन कश्या-बश्या वचलेल्या द्राक्षबागा अनेक शेतकऱ्यांनी जीवापाड मेहनत आणि कर्ज काढून, महागडी औषधे फवारणी करून जगवल्या.आणि आता हाता-तोंडाशी आलेल्या या बागा पुन्हा निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात सापडल्या आहेत.गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस पडत आहेत.त्यामुळे या बागांवर रोगांचा प्रादुर्भाव होणार आहे.
त्यामुळे द्राक्ष बागायतदारांची चिंता वाढली आहे.आणखी दोन दिवस असे ढगाळ वातावरण राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना समोर या बागा कश्या वाचवायच्या हा प्रश्न निर्माण झाला आहे.

सुमारे 40 हजार एकर क्षेत्रावरील बागा सध्या धोक्यात आहे.निसर्गाशी दोन हात करून फुलवलेल्या या बागा आहेत.तर आधीच महापूर,अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले.त्यात पुन्हा निसर्गाचा कहर होत असल्याने,आता सरकारने या द्राक्ष बाग शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे.

बाईट :- होणाप्पा होणनावर ,शेतकरी - खटाव,मिरज.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.