ETV Bharat / state

भंडारा दुर्घटनेची सरकारकडून गंभीर दखल - पालकमंत्री विश्वजीत कदम

बालकांच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी बाब आहे, या दुर्घटनेची राज्य सरकारने आणि पालकमंत्री म्हणून आपण गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल,अशी माहिती भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली आहे. ते सांगलीच्या कडेगावमध्ये बोलत होते.

भंडारा दुर्घटनेची सरकारकडून गंभीर दखल
भंडारा दुर्घटनेची सरकारकडून गंभीर दखल
author img

By

Published : Jan 9, 2021, 2:25 PM IST

सांगली - जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागली. या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. बालकांच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी बाब आहे, या दुर्घटनेची राज्य सरकारने आणि पालकमंत्री म्हणून आपण गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल,अशी माहिती भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली आहे. ते सांगलीच्या कडेगावमध्ये बोलत होते.

भंडारा दुर्घटनेची सरकारकडून गंभीर दखल

सरकारकडून गंभीर दखल

सकाळपासून या घटनेच्या बाबतीत जिल्हाधिकारी, संबंधित अधिकारी या सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. मात्र या दुर्घटनेत वाचलेल्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्याच बरोबर या दुर्घटनेत मृत पावलेल्या बालकांच्या कुटुंबांना सर्वतोपरी राज्य सरकारकडून मदत केली जाईल, असा विश्वासही मंत्री कदम यांनी व्यक्त केला आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात या सर्वांनी घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

घटना काय घडली?

शनिवारी मध्यरात्री दोन वाजता ही आग लागली. SNCU मध्ये एकूण 17 नवजात बालके होती. या विभागामध्ये आऊट बॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी इन बॉर्नमधील सात बालके सुखरूप आहेत. तर आऊट बॉर्न युनिटमधील 10 बालंकांचा मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले.

हेही वाचा - भंडारा हादरला! शिशु केअर युनिटला आग लागून १० बालकांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.