सांगली - शेतकऱ्यांनो आता आपल्यालाच आपल्या सर्जा-राजा आणि शेतीमातीसाठी एकत्र यावं लागणार आहे, अशी साद घालत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारच्या विरोधात भव्य बैलगाडा-छकडा शर्यतीचे आयोजन केले आहे. 20 ॲागस्ट रोजी सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील झरे येथे बंदी झुगारून शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.
शर्यत परवानगीसाठी शर्यतीचे आयोजन -
महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीला बंदी आहे. नुकताच राज्यभरात शेतकरी विविध शेतकरी संघटनांनी रस्त्यावर उतरत बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळावी यासाठी ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलने केली. मात्र आता भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शर्यतीला परवानगी मिळावी, यासाठी थेट बैलगाडी आणि छकडा गाडी शर्यतीचे जाहीर आयोजन केले आहे. आटपाडी तालुक्यातल्या झरे या आपल्या गावी विना-लाठी काठी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच या स्पर्धेसाठी थेट लाखांचे बक्षीस ही जाहीर करण्यात आले आहे.
शर्यतीला परवानगी मिळण्यासाठी गोपीचंद पडळकरांकडून बंदी झुगारुन बैलगाडा-छकडा शर्यतीचे आयोजन
महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीला बंदी आहे. नुकताच राज्यभरात शेतकरी विविध शेतकरी संघटनांनी रस्त्यावर उतरत बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळावी यासाठी ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलने केली. मात्र आता भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शर्यतीला परवानगी मिळावी, यासाठी थेट बैलगाडी आणि छकडा गाडी शर्यतीचे जाहीर आयोजन केले आहे.