ETV Bharat / state

'मोफत लसीकरणाची घोषणा करताना आरोग्यमंत्र्यांनी गांजा ओढला होता का?' - गोपीचंद पडळकर यांच्या बद्दल बातमी

मोफत लसीकरणाची घोषणा करताना आरोग्यमंत्र्यांनी गांजा ओढला होता का?, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. ते सांगलीमध्ये बोलत होते.

Gopichand Padalkar criticizes health minister
मोफत लसीकरणाची घोषणा करताना आरोग्यमंत्र्यांनी गांजा ओढला होता का? - गोपीचंद पडळकर
author img

By

Published : Apr 29, 2021, 6:09 PM IST

Updated : Apr 29, 2021, 6:53 PM IST

सांगली - मोफत लसीकरणाची घोषणा करताना आरोग्यमंत्री गांजा ओढून होते का, अशी घणाघाती टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. आधी लसीकरण मोफत आणि नंतर 1 तारखेपासून लसीकरण शक्य होणार नसल्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या घोषणेवरून पडळकरांनी निशाणा साधला आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.

'मोफत लसीकरणाची घोषणा करताना आरोग्यमंत्र्यांनी गांजा ओढला होता का?'
जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर,लक्ष द्या -सांगली जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या, त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांचे हाल होत आहेत, असा आरोप करत भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे. त्यांना सांगली जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील निर्माण झालेल्या परिस्थितीवर अधिक लक्ष देण्याच्या मागणीसाठी भेट घेऊन निवेदन दिले. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार गोपीचंद पडळकरांनी राज्य सरकारवर मोफत लसीकरण आणि कोरोनाच्या परिस्थितीवरून जोरदार निशाणा साधला. शासकीय रुग्णालयात बेड संख्या वाढवा -त्यांच्याकडे आमचं इतकेच म्हणणे आहे, की तुम्ही जे आता नवीन बेड वाढवणारा हा ते शासकीय हॉस्पिटलमध्ये वाढवा कारण गरीब लोकांना बाहेर पैसे देणे शक्य नाही,लाख-लाख, दीड लाख, दोन लाख रुपये बिल भरण्याची त्यांची क्षमता नाही,तसेच जे कोरोना केअर सेंटर उभे केलेले आहेत, ते सगळेच covid-19 केअर सेंटर हे महात्मा फुले योजने अंतर्गत येत नाहीत. म्हणून त्यांच्या चरणी विनंती केली, की तुम्ही सरकारी दवाखान्यांमध्ये जास्तीत जास्त बेड वाढवा,अशी मागणी केली आहे. पडळकर म्हणाले, की जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून जितक्या रूग्णांचे आम्हाला बेडसाठी फोन आले, तितक्यांना आम्ही रुग्णालयाला फोन केल्यानंतर एक ही बेड उपलब्ध होऊ शकला नाही. व्हेंटिलेटरवर बेड उपलब्ध होत नाही म्हणून मी आणि सदाभारू खोत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी कलेक्टर ऑफिसला आलो. आमचे इतकेच म्हणणे आहे, की तुम्ही जे नवीन बेड वाढवणार आहात ते शासकीय रुग्णालयामध्ये वाढवा. गरीब लोकांना बाहेर पैसे देणे शक्य नाही. लाख लाख ते दीड लाख, दोन लाख रुपये बिल भरण्याची त्यांची क्षमता नाही. जे कोरोना केअर सेंटर उभे केले आहे, ते सगळेच महात्मा फुले योजनेंतर्गत येत नाही. म्हणून आम्ही त्यांना विनंती केली, की सरकारी दवाखान्यांमध्ये जास्तीत जास्त बेड वाढवा.

जयंत पाटील निष्क्रिय पालकमंत्री -

आम्ही तुम्हाल विरोधाला विरोध करणार नाही. आमच्या काही सूचना तुम्ही मान्य करायला पाहिजे होत्या. पालकमंत्र्यांनी जेवढ्या बैठका घेतल्या, त्या औपचारिक म्हणून घेतल्या. पेपरमध्ये आणि टिव्हीवर दिसण्यासाठी त्यांनी बैठका घेतल्याचा आरोप पडळकर यांनी केला. ते पुढे म्हणाले प्रत्येक बैठकीमध्ये जे आम्ही मुद्दे मांडले, ते जनतेच्या हिताचे होते. या मुद्यांवर त्यांनी निर्मय केलेला नाही. पालकमंत्री जिल्ह्यात अजिबात फिरत नाहीत. आतापर्यंत जेवढे पालकंमत्री बघितले त्यातले सगळ्यात निष्क्रिय पालमंत्री म्हणून जयंत पाटील यांची इतिहासामध्ये नोंद होईल. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. मात्र, सरकार आणि प्रशासन गंभीतेने घेत नाही आहे. ही शोकांतिका असल्याचे पडळकर म्हणाले

आरोग्यमंत्र्यांनी गांजा ओढला होता का? -

बुधवारी सकाळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घोषित केले की एक तारखेपासून आम्ही 18 ते 44 या वयोगटातल्या लोकांचे मोफत लसीकरण करणार आहे. नंतर त्यांनी सांगितले की ते करता येणार नाही, इतके गोंधळलेली हे लोक आहेत. लसीकरण करता येणार नव्हते तर मग सकाळी तुम्ही जी प्रेस घेतली ती गांजा ओढून घेतली होती का? लस उपलब्ध नाही, हे तुम्हाला माहित नव्हते का? यांना केवळ केंद्राकडे बोट दाखवायचे, केंद्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा आहे.

राज्यातील जनतेची जिरवण्याचा उद्योग -

मुळात हे तिन्ही पक्ष विचारसरणी एक नसताना फक्त भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रमध्ये चांगल्या पद्धतीने काम करते. देवेंद्र फडणवीस चांगल्या पद्धतीने काम करत आहे. त्या एका अजेंड्यावर आणि भारतीय जनता पार्टीची जिरवण्यासाठी एकत्र आलेत. मात्र, पार्टीचे काम चांगले असल्यामुळे त्यांना ते जमले नाही. असे पडळकर म्हणाले. मात्र, महाराष्ट्रातल्या जनतेचे जिरवण्याचे काम या तीन पक्षाच्या सरकारने केलेला आहे. आघाडी सरकारने यातून बाहेर येऊन केंद्राकडे बोट न दाखवता राज्याने कुठल्याही लोकांचा मृत्यू होऊ नये, अशा पद्धतीची सगळी आरोग्याची वाटचाल करावी,अशी हात जोडून आमची मागणी असल्याचे पडळकर यांनी स्पष्ट केले.

Last Updated : Apr 29, 2021, 6:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.