ETV Bharat / state

भाजपचे जिल्हा परिषद सदस्यासह तीन जणांविरुद्ध रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून अपहरणाचा गुन्हा दाखल

भिलवडीचे भाजप जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांच्यासह तिघांच्या विरोधात बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये तिघांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

author img

By

Published : Jun 6, 2021, 9:01 PM IST

Updated : Jun 6, 2021, 9:09 PM IST

fir against zp member
fir against zp member

सांगली - भिलवडीचे भाजप जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांच्यासह तिघांच्या विरोधात बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये तिघांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. आर्थिक देवाण-घेवाणीतून हा प्रकार घडला आहे.

जिल्हा परिषद सदस्याकडून अपहरणाचा प्रयत्न -

सांगलीचे बांधकाम व्यवसायिक राहुल तावदर यांचा अपहरण करत बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी तावदर यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यांमध्ये सांगलीच्या भिलवडीचे जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांच्यासह तिघांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. सावकारी, अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न असे गुन्हे दाखल झाले आहेत.

जिल्हा परिषद सदस्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल
सुरेंद्र वाळवेकरांसह तिघांवर गुन्हे दाखल -
राहुल तावदर यांच्या वडिलांनी सुरेंद्र वाळवेकर यांच्याकडून चार वर्षांपूर्वी जमिनीच्या व्यवहारासाठी 15 लाख रुपये उसनवारी घेतली होती. ते पैसे तावदर यांनी परत केले होते. मात्र वाळवेकर यांच्याकडून 4 वर्षे माझे पैसे वापरले होते. त्यामुळे त्याच्या व्याजासाठी तगादा लावला होता. दोन महिन्यांपासून हा तगादा सुरू होता. त्यातून शनिवारी सांगलीतील कॉलेज कॉर्नर या ठिकाणी सुरेंद्र वाळवेकर यांनी राहुल तावदर यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून अपहरण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद दाखल झाली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे, अधिक तपास पोलीस करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Last Updated : Jun 6, 2021, 9:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.